महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BMC Fined Lalbagh Raja Mandal : लालबाग राजा मंडळाला 'या' कारणाने महापालिकेने ठोठावला ३ लाखांचा दंड - लालबागच्या राजाला पालिकेने ठोठावला ३ लाखांचा दंड

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मंडप उभारणीसाठी रस्ते, पदपथ आणि उद्यानात खड्डे खोदले होते. उत्सव झाल्यानंतर मंडळाकडून हे खड्डे बुजवण्यात ( BMC fined Lalbagh Raja Ganapati Mandal ) आले नव्हते. यासाठी पालिकेने मंडळांना ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

BMC Fined Lalbagh Raja Mandal
BMC Fined Lalbagh Raja Mandal

By

Published : Sep 20, 2022, 6:58 PM IST

Updated : Sep 20, 2022, 7:16 PM IST

मुंबई - मुंबईमधील सुप्रसिद्ध अशा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मंडप उभारणीसाठी रस्ते, पदपथ आणि उद्यानात खड्डे खोदले होते. उत्सव झाल्यानंतर मंडळाकडून हे खड्डे बुजवण्यात BMC fined Rs 3 lakh Lalbagh Raja Ganapati Mandal आले नव्हते. यासाठी पालिकेने मंडळांना ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मुंबईमधील सुप्रसिद्ध अशा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मंडप उभारणीसाठी रस्ते, पदपथ आणि उद्यानात १८३ खड्डे खोदले होते. उत्सव झाल्या नंतर मंडळाकडून हे खड्डे बुजवण्यात आले नव्हते. यासाठी पालिकेने मंडळांना ३ लाख ६६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी मागवलेल्या माहितीमधून ही माहिती समोर आली आहे.

खड्डे बुजवणे गरजेचे होतेमुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. उत्सव साजरा करण्यासाठी मोठे मंडप उभारले जातात. बहुसंख्य मंडप रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागेत उभारले जातात. मंडप उभारण्यासाठी खड्डे खोदावे लागतात. अशेच खड्डे लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाकडून खोदण्यात आले होते. मंडप, सुरक्षा मार्ग यासाठी मंडळाकडून खड्डे खोदण्यात आले होते. गणेशोत्सव साजरा झाल्यावर मंडळाने हे खड्डे बुजवणे गरजेचे होते. मात्र मंडळाकडून खड्डे बुजवले नसल्याने पालिकेच्या भायखळा येथील ई विभाग कार्यालयाकडून दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी दिली.



३ लाख ६६ हजार रुपये दंड -लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने फुटपाथवर संरक्षण मार्गिका उभारली होती. त्यासाठी बेकायदेशीपणे फुटपाथवर ५३ आणि रस्त्यावर १५० असे एकूण १८३ खड्डे खोदले आहेत. या खड्ड्यांसाठी पालिकेच्या नियमानुसार प्रति खड्डा २ हजार रुपये या प्रमाणे ३ लाख ६६ हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड पालिकेच्या ई विभाग कार्यालयात भरावा असे मंडळाला ७ सप्टेंबर रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Last Updated : Sep 20, 2022, 7:16 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details