महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Property Tax in Mumbai : मालमत्ता कर थकबाकी वसुलीत मुंबई महापालिका नापास - Property Tax in Mumbai

मुंबई महानगरपालिकेने जकात कर रद्द झाल्याने मालमत्ता कर वसुलीवर भर दिला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात 6 हजार कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसुलीचे ( recovery of property tax ) लक्ष पालिकेने ठेवले होते. वर्ष अखेरीस 5 हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल ( property tax of Rs 5000 crore ) करण्यात पालिकेला यश आले आहे. मालमत्ता कर वसूल करता यावा म्हणून थकबाकी वसुलीसाठी गेल्या काही महिन्यांपासून कारवाईचा बडगा उगरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मालमत्ता कर थकबाकी
मालमत्ता कर थकबाकी

By

Published : Apr 1, 2022, 4:12 PM IST

Updated : Apr 1, 2022, 4:41 PM IST

मुंबई- मुंबई महापालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्या करदात्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. पालिकेने धडक कारवाई करत 5821 मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांमधून पालिकेला 3918 कोटी रुपयांची थकबाकी वसूल होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ 728 कोटी रुपयांचा कर या कारवाईतून वसूल करण्यास पालिकेला यश आले आहे.

मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष -मुंबई महानगरपालिकेने जकात कर रद्द झाल्याने मालमत्ता कर वसुलीवर भर दिला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात 6 हजार कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसुलीचे ( recovery of property tax ) लक्ष पालिकेने ठेवले होते. वर्ष अखेरीस 5 हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल ( property tax of Rs 5000 crore ) करण्यात पालिकेला यश आले आहे. मालमत्ता कर वसूल करता यावा म्हणून थकबाकी वसुलीसाठी गेल्या काही महिन्यांपासून कारवाईचा बडगा उगरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

5 हजार मालमत्ता जप्त -मुंबई महापालिकेने 3918 कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीसाठी आतापर्यंत 5, 821 मालमत्ता जप्त केल्या आहेत. मालमत्ता कर वसुलीसाठी करण्यात आलेल्या कारवाईतून 728 कोटी रुपये कर जमा झाला आहे. जप्त मालमत्तांमध्ये इमारती, भूखंड, कार्यालये, वाहने, संगणक, वातानुकूलित यंत्रणा आदी वस्तूंचा समावेश आहे. जप्त मालमत्तांचे मूल्य ठरवण्यासाठी निविदा मागवून संस्थेची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलक विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली.

अशी वसूल केली जाते थकबाकी - जप्त करण्यात आलेल्या थकबाकीदारांकडून दोन टक्के दंडासह कराची वसुली करण्यात येणार आहे. मात्र, त्यानंतरही कराचा भरणा न केल्यास संबंधित मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. करवसुलीसाठी पालिकेने मुंबईत ठिकठिकाणी फलक लावले आहेत. चालू वर्षासह थकीत मालमत्ता कर तात्काळ भरावा, अन्यथा पालिकेच्या अधिनियम 1888 नुसार मालमत्तेची जप्ती, दंड वसुली, मालमत्तेचा लिलाव करणे यासारख्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे.

बिल्डरांवर जप्तीची कारवाई करा -मुंबई महापालिका सामान्य नागरिकांनी मालमत्ता कर भरला नाही तर त्यांचे पाणी कापते, मालमत्ता जप्त करते. मात्र बिल्डरांवर अशी कारवाई केली जात नाही. बिल्डरांकडे मालमत्ता कराची सुमारे 2 हजार कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी एकाही बिल्डरवर कारवाई करण्यात आलेली नाही. एकाही बिल्डरचे पाणी कापण्यात आलेले नाही. एकाही बिल्डरची मालमत्ता जप्त करण्यात आलेली नाही. सामान्य नागरिकांवर करण्यात येणाऱ्या कारवाईप्रमाणे पालिका अधिकाऱ्यांनी बिल्डरवर कारवाई करून दाखवावी, असे आवाहन माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केले आहे.

मालमत्ता करवाढ टळली -2020 पासून मालमत्ता करवाढ होणे अपेक्षित होते. पालिका निवडणूक 2022 मध्ये होणार असल्यानही करवाढ सत्ताधारी शिवसेनेने टाळली होती. 2022 - 23 चा अर्थसंकल्प सादर करताना पालिका आयुक्तांनी मालमत्ता करवाढ केली जाईल, असे संकेत दिले होते. करवाढ एप्रिलपासून होणार होती. मात्र याचा बोजा मुंबईकरांवर पडणार असल्याने ही करवाढ तूर्तास टाळण्यात आली आहे. करवाढ होणार नसल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा-Nepal PM Visit to India : भारत-नेपाळ संबंध पूर्ववत होणार? नेपाळचे पतंप्रधान भारत दौऱ्यावर, मंदिरांना देणार भेटी

हेही वाचा-टीबीच्या लसींची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी चाचण्या

हेही वाचा-Samrudhi Mahamarg:समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी पहिला टप्पा पूर्ण मुख्यमंत्री घेणार आढावा


Last Updated : Apr 1, 2022, 4:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details