महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Omicron Variant : ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर बेडस, ऑक्सिजनसह मुंबई महापालिका सज्ज! - मुंबई पालिका बेड ऑक्सिजन

दक्षिण आफ्रिकेसह काही देशात कोरोनाचा ओमायक्रोन (Omicron Variant) हा नवा व्हेरियंट समोर आला आहे. या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने तो घातक आहे. या पार्श्वभूमीवर ओमायक्रोनचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका (BMC ready to fight against Omycron) सज्ज झाली आहे.

bmc and corona
मुंबई पालिका

By

Published : Dec 2, 2021, 10:20 PM IST

मुंबई - जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार वाढला आहे. दक्षिण आफ्रिकेसह काही देशात कोरोनाचा ओमायक्रोन (Omicron Variant) हा नवा व्हेरियंट समोर आला आहे. या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने तो घातक आहे. या पार्श्वभूमीवर ओमायक्रोनचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका (BMC ready to fight against Omycron) सज्ज झाली आहे. विषाणूचा प्रसार वाढल्यास बेडस (Beds) आणि ऑक्सिजन (Oxygen) पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (BMC Additional Commissioner Suresh Kakani) यांनी दिली.

  • कोरोना विषाणूचा प्रसार -

मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत मुंबईत कोरोना विषाणूच्या दोन लाटा आल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला यश आले आहे. करण्यात आलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे सध्या रुग्णसंख्या आटोक्यात आहे. दिवसाला १०० ते २०० रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत रुग्णसंख्या आटोक्यात आली असतानाच जगभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिका आणि काही देशात कोरोनाचा ओमायक्रोन हा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. या विषाणूचा प्रसार मुंबईत होऊ नये यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या आरटीपीसीआर आणि जिनोम सिक्वेनसिंग चाचण्या केल्या जात आहेत. तसेच रुग्णसंख्या वाढल्यास रुग्णांसाठी बेडस आणि ऑक्सिजनसह आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

  • गरेजपेक्षा जास्त ऑक्सिजनचा साठा -

मुंबईत दिवसात ११२४ मॅट्रिक टन ऑक्सिजनचा साठा असतो. त्यापैकी सध्या ६९० मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासते. पीएसए प्लांट, टँक, सिलिंडर्स व रिफिलिंग आणि स्टोरेजच्या माध्यमातून ऑक्सिजन उपलब्ध आहे. पीएसए प्लांट, टँक आणि सिलिंडर्स व रिफिलिंग आणि स्टोरेजच्या माध्यमातून ऑक्सिजन उपलब्ध आहे. लिक्विड ऑक्सिजन टॅंक २४ तासात रिफिल केल्या जातात. त्यात ४० मॅट्रिक ऑक्सिजन उपलब्ध होतो. पालिका रुग्णालये आणि कोविड सेंटर येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे १७ प्लान्ट उभारले जात आहेत. त्यापैकी १० प्लांट सज्ज केले आहेत असे काकाणी यांनी सांगितले.

  • ३० हजार बेड उपलब्ध होतील -

सध्या कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात असल्याने रुग्णसंख्या कमी आहे. यामुळे पालिकेचे वरळी-एनएससीआय, मुलुंड, भायखळा, नेस्को गोरेगाव आणि दहिसर चेकनाका ही पाच जंम्बो कोविड सेंटर सुरू आहेत. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह जंम्बो कोविड सेंटर सुरू आहेत. यात एकूण १७ हजार बेडवर फक्त ६०० म्हणजेच पाच ते सहा टक्के रुग्ण आहेत. गरज भासल्यास दहा जम्बो कोविड सेंटर आणि इतर रुग्णालयांमधील बेड कायान्वित केल्यास ३० हजार बेड उपलब्ध होतील, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

  • जम्बो सेंटरमुळे १३,४६६ बेड उपलब्ध होणार -

ओमायक्रोन पार्श्वभूमीवर पालिकेने दहा जम्बो कोविड सेंटर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या दहा जम्बो कोविड सेंटरमुळे १३,४६६ बेड उपलब्ध होणार आहेत. यात बीकेसी कोविड सेंटरमध्ये २३२८ बेड, मालाड जम्बो कोविड सेंटर २२०० बेड, नेस्को गोरेगाव फेज १ - २२२१ बेड, नेस्को गोरगाव फेज २ - १५०० बेड, कांजूरमार्ग कोविड सेंटर - २००० बेड,आरसी मुलुंड जम्बो सेंटर - १७०८ बेड, सायन जम्बो कोविड सेंटर - १५०० बेड, आरसी भायखळा सेंटर - १००० बेड, दहिसर चेक नाका, कांदरपाडा - ७०० बेड उपलब्ध होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details