महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BMC Election 2022 शिवसेनेसाठी करो या मरोची लढाई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

राज्यातील सत्ता संघर्षानंतर आता गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर Mumbai Municipal Corporation सत्ता असलेल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईतील शिवसेनेची ताकद लक्षात घेता, भाजपने शिंदे गट आणि मनसेला हाताशी धरत कोंडी करत आहे. Will Make Or Break Shivsena दुसरीकडे बालेकिल्ले अबाधित राखण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांची धडपड सुरू आहे.

BMC Election 2022
BMC Election 2022

By

Published : Sep 8, 2022, 7:54 PM IST

मुंबईराज्यातील सत्ता संघर्षानंतर आता गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर Mumbai Municipal Corporation सत्ता असलेल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईतील शिवसेनेची ताकद लक्षात घेता, भाजपने शिंदे गट आणि मनसेला हाताशी धरत कोंडी करत आहे. Will Make Or Break Shivsena दुसरीकडे बालेकिल्ले अबाधित राखण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांची धडपड सुरू आहे. मुंबईतून ठाकरे सेना हद्दपार करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेनेसाठी ही करो या मरोची लढाई लढावी लागणार आहे. BMC Election 2022 या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.

शिंदे गटात सामील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी दुफळी निर्माण झाली आहे. ४० आमदार आणि १२ खासदारां पाठोपाठ अनेकजण शिंदे गटात सामील होत आहेत. बंडखोरनंतर शिंदे गटाने शिवसेनेवर दावा ठोकला. तर राज्यात झालेल्या सत्तापालट विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आव्हान दिले आहे. शिवसेना कोणाची हा वाद ही न्यायालयात गेला आहे. सुमारे दोन महिन्यापासून हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर खापर फोडणाऱ्या शिंदे गटाकडून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाच आता आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी हालचालीगेल्या २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. पक्षात बंडखोरी फारशी झाली नाही. यंदा शिवसेनेने भाजपने डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्यासोबत सलगी करत देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या ७२ तासांचे सरकार बनवले. शिवसेनेने याचा वचपा काढण्यासाठी कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. अडीच वर्षे सरकारचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत बंडाचे निशाण फडकवत सुरत, गुवाहाटी गाठले. भाजपने छुप्या पध्दतीने मदत करत राज्यात सत्तांतर घडवून आणले. आता मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी भाजपने शिंदे आणि मनसेला सोबत घेतले आहे. मराठी मतांचे विभाजन आणि शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी ही व्यूहरचना आखली आहे. शिवसेनेची महापालिका निवडणुकीत वाट खडतर बनली आहे.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर डोळा मुंबईत उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई या 6 लोकसभा मतदारसंघाचा यात समावेश होतो. अनेक प्रभागात शिवसेनेचे गड प्रस्तापित आहेत. दक्षिण मुंबईतील लालबाग- परळ काळाचौकी, शिवडी, वरळी, प्रभादेवी, दादर, माटुंगा, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, कांजूरमार्ग, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, वांद्रे, खार आदी भागात शिवसेनेचा वर्चस्व राहिला आहे. भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मतदार संघातही काँग्रेसचा एक नगरसेवक वगळता शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यावर भाजप सहित शिंदे गट आणि मनसेचा डोळा आहे. त्यात शिवसेनेतील बंडखोरीमुळे आता गणिते बदलणार आहेत. मुंबईत निवडणुकीच्या रणांगणांत उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या विद्यमान आमदार, माजी आमदार, आजी, माजी नगरसेवक, छोटे- मोठे सक्रीय कार्यकर्ते तिकीटासाठी पर्याय खुले होणार आहेत. पक्षातील नाराजी थोपवण्याचे आव्हान देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढे असणार आहे.

असा असेल जागा वाटपाचा फॉर्म्युलामुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ही निवडणूक चुरशीची मानली जाते आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही मैदानात उतरले असून, 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य शिवसेनेने ठेवले आहे. तर मुंबईत गणरायांच्या दर्शनासाठी आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी 150 जागा जिंकण्याचे टार्गेट एकनाथ शिंदे गट आणि भाजपाला दिलेले आहे. भाजपा, शिंदे गट आणि मनसे हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर शिंदे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सध्या सुरु आहे. जागावाटपात कुणाच्या पदरात किती जागा येतील, यावरही गणिते ठरली जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या मुंबई मनपा निवडणुकीत १५० जागा भाजप तर उर्वरित ७७ जागांचे दोन भागात विभाजन केले जाणार आहे. शिंदे गटाच्या वाट्याला ३० तर मनसेला ४७ जागा सोडल्या जाणार असल्याचे समजते. मात्र, युतीचा फॉर्म्युला काय असेल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

शिवसेनेची रणनीती २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेला २२७ पैकी ८४ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे उमेदवार ८९ प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर होते. शिवसेना विरुद्ध भाजप अशा थेट लढतीत ६२ ठिकाणी भाजप तर ४३ ठिकाणी शिवसेना जिंकली होती. या जागांवर भाजपचे विशेष लक्ष असणार आहे. एकनाथ शिंदे गटाची आणि मनसेचीही मदत घेण्यात येणार असल्याचे समजते. तर शिवसेना स्वबळावर मनपा निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी म्हणून रिंगणात उतरतील. मात्र, ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असेल, तेथे दोन्ही पक्ष उमेदवार देणार असल्याचे समजते, असे झाल्यास शिवसेनेला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना- 84

भाजपा- 82

काँग्रेस - 31

राष्ट्रवादी - 09

मनसे - 07

सपा- 06

एमआयएम - 02

अखिल भारतीय सेना - 01

अपक्ष - 05

ABOUT THE AUTHOR

...view details