महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ashish Shelar मुंबई पालिकेवर भगवा फडकवायला सज्ज रहा, आशिष शेलारांनी निवडणुकीचं रणशिंग फुकलं - आशिष शेलार शिवसेनेवर टीकास्त्र

मुंबईला सुविधा आणि प्रकल्प केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत याची माहिती मुंबईकरापर्यंत पोहचावा याचसोबत उद्धव ठाकरे यांचा भ्रष्टाचार छातीठोक मुंबईकरांना सांगा पालिकेवर भगवा फडकवायला सज्ज राहा असे आवाहन आशिष शेलार यांनी केलं ashish shelar criticized shivsena आहे

Ashish Shelar
Ashish Shelar

By

Published : Aug 20, 2022, 5:24 PM IST

मुंबई -मुंबई महानगरपालिकेचे bmc election 2022 बजेट ४५ हजार कोटींचे आहे. हे बजेट देशातील ७ लहान राज्यापेक्षा मोठे आहे. बजेट मोठे असले तरी आपण मुंबईकरांना काय सुविधा दिल्या हे महत्वाचे आहे. मुंबईला सुविधा आणि प्रकल्प केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याची माहिती मुंबईकरापर्यंत पोहचावा. याचसोबत उद्धव ठाकरे यांचा भ्रष्टाचार छातीठोक मुंबईकरांना सांगा. पालिकेवर भगवा फडकवायला सज्ज राहा, असे आवाहन करत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला ashish shelar criticized shivsena आहे.

भाजपाच्या मुंबई भाजपा अध्यक्ष पदावर आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती झाली आहे. तसेच, माजी मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे राज्यात मंत्री झाले आहेत. या दोघांचा सत्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज षण्मुखानंद हॉल, माटुंगा येथे करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आशिष शेलार बोलत होते.

'ही लढाई भ्रष्टाचारा विरोधातील' - यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले, मुंबई महापालिकेचे बजेट इतर ७ राज्यापेक्षा मोठे आहे. पण, त्यामाध्यमातून पालिकेने नागरिकांना कोणत्या सुविधा दिल्या, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला. मुंबईला मेट्रो फडणवीस यांनी दिली, पुल गडकरी यांनी दिले, अंडरवर्ल्ड गोपीनाथ मुंडे यांनी संपवले. बुलेट ट्रेन मोदी सरकारने दिली, कोस्टल रोड परवानगी फडणवीस यांनी दिली, पाणी तुंबू नये म्हणून अर्धे पैसे केंद्राने दिले. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केवळ भ्रष्टाचार केला. ही लढाई भ्रष्टाचारा विरोधातील आहे. मुंबईकरांना त्यांची सत्ता हवी आहे. ती देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मिळेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.

'हम खडे होते है वहा से लाईन शुरू' -मंगलप्रभात लोढा यांनी देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातील अमिताभ बच्चन म्हटले आहे. मला अमिताभ यांचा डायलॉग आठवतो आहे. हम खडे होते है वहा से लाईन शुरू होती है, हा डायलॉग देवेंद्र फडणवीस यांना लागू होतो. त्यांनी तशी राजकीय परिस्थिती राज्यात निर्माण केली आहे. पक्षाने मला मुंबई अध्यक्ष बनवले नाही, तर एका विचाराला आणि जागृतीला अध्यक्ष बनवले आहे. एक प्रवृत्ती म्हणून मला अध्यक्ष पदावर बसवले आहे. अध्यक्ष कोण बसला यापेक्षा काय केले हे महत्वाचे आहे. मागील निवडणुकीत आपण ३२ वरून ८२ नगरसेवक निवडून आणले. आता त्यापुढे जायचे आहे. महाभारत सुरु झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत. यामुळे पालिकेवर भगवा फडकवायला सज्ज व्हा, असे आवाहन शेलार यांनी केलं.

'आता मुंबई भाजपाची' -गेले २५ वर्षे काही लोक मुंबई आमची बोलत होते. आता मुंबई कोणाची नाही तर ती भाजपची आहे. भाजपची मुंबईमध्ये ओळख निर्माण करण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले आहे. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी २५ वर्षे मुंबईला लुटले. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुदर्शन चक्राने त्यांचा शर विच्छेदन होईल. फडणवीस महाराष्ट्राच्या राजकरणामधील अमिताभ बच्चन आहेत, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -Devendra Fadnavis उद्धव ठाकरेंनी केलेला भ्रष्टाचार मुंबईकरांसमोर मांडा, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details