महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai covid care centre : मुंबईतील बंद केलेल्या कोविड सेंटरमधील साहित्याचे काय होणार? मुंबई महापालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय - मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार

संपूर्ण जगभरात कोरोना महामारीची लाट उसळली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यात आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याने कोरोना महामारिचा सामना करण्यासाठी आरोग्याच्या सुविधा वाढविण्यात आल्या होत्या. महामारीवर मुंबई महापालिकेने १० कोविड सेंटर बांधली होती. कोरोना प्रसार कमी झाल्याने ही कोविड सेंटर बंद करण्यात आली आहे. त्यामधील साहित्य पालिकेच्या रुग्णालयात वापरण्यात येत आहे तर उर्वरित साहित्य राज्य सरकारच्या मेडिकल कॉलेजला देण्यात येणार ( Mumbai Municipal Corporation ten Covid Centers materials give to the State Government Medical College ) असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी दिली.

Mumbai Municipal Corporation ten Covid Centers materials give
मुंबईतील कोविड सेंटरमधील साहित्य राज्य सरकारच्या मेडिकल कॉलेजला दिले जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी दिली.

By

Published : Oct 10, 2022, 10:42 AM IST

Updated : Oct 10, 2022, 11:33 AM IST

मुंबई - संपूर्ण जगभरात कोरोना महामारीची लाट उसळली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यात आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याने कोरोना महामारिचा सामना करण्यासाठी आरोग्याच्या सुविधा वाढविण्यात आल्या होत्या. महामारीवर मुंबई महापालिकेने ( Mumbai Municipal Corporation ) १० कोविड सेंटर बांधली होती. कोरोना प्रसार कमी झाल्याने ही कोविड सेंटर बंद करण्यात आली आहे. त्यामधील साहित्य पालिकेच्या रुग्णालयात वापरण्यात येत आहे तर उर्वरित साहित्य राज्य सरकारच्या मेडिकल कॉलेजला ( State Government Medical College ) देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी दिली.

१० कोविड केंद्र सुरू - मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. हॉस्पिटलमधील बेड कमी पडल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसी येथे पहीले जंबो कोविड सेंटर सुरू केले. त्यानंतर महापालिकेने मुंबईत एकूण १० कोविड सेंटर सुरू केली. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून ऑक्सिजन प्लांट, व्हेंटिलेटर, आयसीयू आदी सुविधा सुरू करून या सेंटरमध्ये लाखो रुग्णांवर उपचार आणि चाचण्या केल्या गेल्या, यामुळे मुंबईमधील कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला आहे.


कोरोना आटोक्यात - मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आली असताना दिवसाला २८०० रुग्णांची रोज नोंद झाली. २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेत रोजची रुग्णसंख्या ११ हजारावर गेली. तिसऱ्या लाटेत हीच रुग्णसंख्या २१ हजार इतकी नोंदवली गेली. २०२२ मध्ये चौथ्या लाटेत सर्वाधिक २३०० इतकी रुग्णसंख्या नोंदवली गेली. सध्या कोरोना प्रसार आटोक्यात असून दिवसाला सुमारे १०० रुग्णांची नोंद होत आहे. यापैकी बहुसंख्य रुग्ण हे लक्षणे नसल्याने घरीच बरे होत आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे, यामुळे पालिकेने आपली १० कोविड सेंटर बंद केली आहेत.


चार हजार कोटी खर्च - जंबो कोविड सेंटर सुरु झाल्यापासून आतापर्यंत चार हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. कोविड सेंटर मधील साहित्य सामुग्री वाया जाऊ नये यासाठी पालिका रुग्णालयाच्या मागणीनुसार पुरवठा करण्यात आला. बेड्स, वेटिलेटर, ऑक्सिजन, उपयोगी पडणारी औषधे राज्य सरकारच्या मेडिकल कॉलेजला देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यासाठी राज्य सरकारकडून पैसे आकाराचे की नाही याचा निर्णय घेण्यात आलेला नाही यावर लवकरच निर्णय होईल, असे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी सांगितले.

कोविड सेंटरमधील उपलब्ध साहित्य - कोरोना प्रसार कमी झाल्याने बंद दहा जम्बो कोविड केंद्र बंद करण्यात आली. या बंद करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये दहिसर चेक नाका, कांदरपाडा - ७००, मालाड जम्बो कोविड सेंटर - २२००, नेस्को गोरेगाव फेज १ - २२२१ , नेस्को गोरगाव फेज २ - १५०० , बीकेसी कोविड सेंटर - २३२८ , कांजूरमार्ग कोविड सेंटर - २००० , शीव जम्बो कोविड सेंटर - १५०० , आरसी भायखळा सेंटर - १०००, आरसी मुलुंड जम्बो सेंटर - १७०८ , सेव्हन हिल्स रुग्णालय अंधेरी - १८५० उपलब्ध आहेत.

Last Updated : Oct 10, 2022, 11:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details