महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'नगरसेवक नसलो तरी घरात बसून राहिलो नाही, नागरिकांची कामेच करतोय' - मुंबई महापालिका माजी नगरसेवक बातमी

नगरसेवक म्हणून काम करताना निधी मिळत होती. आता नगरसेवक नसताना निधी मिळणार नाही. पण पक्षाची शिस्त आणि शिकवण आहे, लोकांची कामे करा आम्ही त्याप्रमाणे कामे करत आहोत. लोकांच्या समस्या सोडवत आहोत. पालिकेवर सध्या पालिका आयुक्तांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रशासक नियुक्त केल्यावर गेल्या काही दिवसात जागो-जागी कचरा पडल्याने प्रशासन सुट्टीवर गेल्याचा अनुभव येत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या आरे गोरेगाव येथील माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी दिली.

bmc corporators reaction to the appointment of administrator
नगरसेवक नसलो तरी घरात बसून राहिलो नाही

By

Published : Apr 26, 2022, 5:03 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्याने नगरसेवकांची पदे रद्द झाली आहेत. मुंबईमध्ये सध्या कोणीही नगरसेवक नाहीत. नगरसेवक पदे नसली तरी आम्ही घरात बसून राहिलेलो नाहीत. लोकांची कामे आधीही करत होतो आताही करत आहोत, अशी प्रतिक्रिया मुंबईमधील माजी झालेल्या नगरसेवकांनी दिली आहे. यामुळे नगरसेवक नसले अधिकार नसले तरी आजही माजी झालेले नगरसेवक नागरिकांच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे.

घरात बसून राहिलेलो नाही - बिंदू त्रिवेदी
मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. पालिकेचा कार्यकाळ संपल्याने नगरसेवकांची पदे रद्द झाली आहेत. नगरसेवक पद रद्द झाले म्हणून घरात बसून राहिलेलो नाही. अनेक कामे झाली आहेत. काही कामे बाकी आहेत त्यावर लक्ष ठेवून आहोत. जी कामे पूर्ण झाली आहेत त्यांची उदघाटन केली जात आहे. जी कामे अपूर्ण आहेत ती लवकर पूर्ण कशी होतील यासाठी प्रयत्न करत आहोत. नागरिकांच्या विकसाची कामे करत आहोत, अशी माहिती भाजपच्या घाटकोपर येथील माजी नगरसेविका बिंदू त्रिवेदी यांनी दिली आहे.

कामे करण्यासाठी पद महत्वाचे नाही - प्रभाकर शिंदे
नागरिकांची कामे करण्यासाठी पद महत्वाचे नाही. समस्या सुरूच आहेत. त्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिवसभर विभागातील नागरिक येऊन भेटतात त्यांची व पक्षाची कामे करत आहोत. मी गेले २० वर्षे नगरसेवक असताना विभागात ४ ते ५ कोलोमीटर फिरत होतो. यावेळी नागरिक मला कामासाठी भेटत होते. आजही ४ ते ५ कोलोमीटर फिरून नागरिकांच्या समस्या सोडवत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.

नागरिकांच्या समस्या सोडवत आहे - रवी राजा
नगरसेवक असताना पालिकेच्या कामात विश्वस्त म्हणून काम करता येत होते. निर्णय घेण्याचे अधिकार होते. आज नगरसेवक नसलो तरी काँग्रेसच्या कार्यालयात रोज सकाळपासून दुपारपर्यंत उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडवत आहे. माजी नगरसेवक म्हणून पालिका कार्यालयात जाऊन आम्ही लोकांचे काम करत आहे. पालिकेवर आता प्रशासक नियुक्त केला आहे. त्यांनी योग्य प्रकारे काम करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली आहे.

प्रशासक नियुक्त केल्यावर प्रशासन सुट्टीवर गेले - प्रिती सातम
नगरसेवक म्हणून काम करताना निधी मिळत होती. आता नगरसेवक नसताना निधी मिळणार नाही. पण पक्षाची शिस्त आणि शिकवण आहे, लोकांची कामे करा आम्ही त्याप्रमाणे कामे करत आहोत. लोकांच्या समस्या सोडवत आहोत. पालिकेवर सध्या पालिका आयुक्तांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रशासक नियुक्त केल्यावर गेल्या काही दिवसात जागो-जागी कचरा पडल्याने प्रशासन सुट्टीवर गेल्याचा अनुभव येत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या आरे गोरेगाव येथील माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details