मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाई केली ( Mumbai drain cleaning ) जाते. त्याचबरोबर चर पुनर्भरणीचे काम केले जाते. मात्र, यावर्षी याबाबत प्रस्ताव मंजूर केला नसल्याने नालेसफाईची कामे सुरू झालेली नाहीत. यावरून पालिका प्रशासनावर टीका करण्यात येत आहे. त्यानंतर आज एकूण ३० निविदांना महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली ( Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal ) आहे. या सर्व निविदांच्या कामांची एकूण किंमत सुमारे ५४५ कोटी रुपये इतकी ( BMC Approves 545 Crore Tenders ) आहे.
नालेसफाईसाठी १६२ कोटी - पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी मोठ्या नाल्यांसाठी एकूण ६ निविदा मंजूर करण्यात आल्या असून, त्या ७१ कोटी रुपयांच्या आहेत. लहान नाल्यांसाठी सुमारे ९१ कोटी रुपये एकत्रित किंमतीच्या १७ निविदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये शहर भागासाठी २, पूर्व उपनगरांसाठी ६ तर पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी ९ याप्रमाणे निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, मोठे व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे १६२ कोटींच्या १६ प्रस्तावांना प्रशासकांनी मान्यता दिली आहे.