मुंबई -शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी तसेच बेकायदा पार्किंगला आळा बसावा म्हणून महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात १०४१ वाहनांवर कारवाई करत महापालिकेने तब्बल ६७ लाख ६५ हजार ५६५ रुपये दंड वसूल केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.
बेकायदा पार्किंगवर पालिकेची कारवाई; महिनाभरात ६७ लाखांचा दंड वसूल
महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या वाहनतळावर गाडी पार्किंग न करता रस्त्यात पार्किंग केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या बेकायदा पार्किंगला आळा बसावा म्हणून महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
बेकायदा पार्किंगवर महापालिकेची कारवाई
महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या वाहनतळावर गाडी पार्किंग न करता रस्त्यात पार्किंग केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. यामुळे महापालिका प्रशासनाने बेकायदा पार्किंगला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई सुरू केली. वाहन तळालगतच्या ५०० मीटर परिसरात बेकायदा पार्किंग केल्यास वाहनचालकाकडून दंड वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ७ जुलैपासून करण्यात येत आहे.