मुंबई - एकाबाजूला कोरोनामुळे मुंबईकर त्रस्त असतानाच पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने मुंबईकरांची डोकेदुखी वाढली आहे. महापालिकेकडे 146 खड्ड्यांच्या तक्रारी आल्या असून त्यापैकी 109 खड्डे बुजवले आहेत तर उर्वरित 37 खड्डे पुढील 48 तासांत बुजवले जातील, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले दिसल्यास त्याचे फोटो काढून मोबाईल अॅप, वेबसाईट, ट्विटर आणि हेल्पलाईन नंबरवर तक्रार करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईत राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत आहे. मात्र मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्याचे काम पालिकेचे रस्ते आणि वाहतूक विभाग करत आहे. मुंबईकरांना उपलब्ध करुन दिलेल्या मोबाईल अॅप, वेबसाईट आणि ट्विटर अकाऊंटवरून पालिकेकडे 1 जुलैपासून आतापर्यंत रस्त्यावर खड्डे पडल्याच्या 146 तक्रारी नोंद झाल्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत पालिकेने आतापर्यंत 109 खड्डे बुजवले आहेत तर उर्वरित 37 खड्डे पुढील 48 तासांत बुजवले जातील, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
इतर प्रशासनाचेही रस्ते