महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ऑनलाइन क्लासेसला दांडी मारणाऱ्या शिक्षकांना 'शिक्षा'... डिसेंबरपासून सक्तीची हजेरी - education department of BMC

लॉकडाऊनच्या काळात काही शिक्षक ऑनलाइन क्लासेस घेत नसल्याचे समोर आले. त्या सर्वांना 'शिक्षा' देणार असल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांनी सांगितले.

मुंबई मनपा शिक्षण समिती
ऑनलाइन क्लासेसला दांडी मारणाऱ्या शिक्षकांना शिक्षा... डिसेंबरपासून सक्तीची हजेरी

By

Published : Nov 23, 2020, 5:39 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र काही शिक्षक ऑनलाइन क्लासेस घेत नसल्याचे समोर आले. यानंतर अशा शिक्षकांना 1 डिसेंबरपासून रोज शाळेत हजर राहण्याची शिक्षा मिळणार आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांनी दिली. यामुळे आता ऑनलाइन शिक्षणाला दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार आहे.

ऑनलाइन क्लासेसला दांडी मारणाऱ्या शिक्षकांना 'शिक्षा'... डिसेंबरपासून सक्तीची हजेरी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. जूनपासून त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. मात्र शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे आव्हान कायम होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या काळात काही शिक्षक ऑनलाइन क्लासेस घेत नसल्याचे समोर आले. त्या सर्वांना शिक्षा देण्याची मागणी होत होती. अखेर शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

शिक्षकांनाच शिक्षा

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे असा निर्णय घेण्यात आला. मात्र अद्याप काही शिक्षक ऑनलाइन शिक्षण देत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत शिक्षण समितीमध्ये चर्चा झाल्यावर संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना 1 डिसेंबरपासून शाळेत रोज येण्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जे शिक्षक रोज ऑनलाइन शिक्षण देण्याचे काम करत आहेत, त्यांना महिन्यातून एकदा शाळेत यावे लागणार आहे. या शिक्षकांकडून प्रशासकीय कामकाज पूर्ण करून घ्यावे, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांनी दिली.

शाळांची संख्या

मुंबई महापालिकेच्या 1 हजार 187 शाळा आहेत. त्यात 2 लाख 96 हजार 815 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर 10 हजार 894 शिक्षक आहेत. खासगी प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित 2 हजार 596 शाळा आहेत. त्यात 7 लाख 96 हजार 814 विद्यार्थी शिक्षण घेत असून 23 हजार 449 शिक्षक शिक्षण देण्याचे काम करत आहेत. यापैकी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये जे शिक्षक ऑनलाइन शिक्षण देण्याचे काम करत नाहीत, त्यांना 1 डिसेंबरपासून शाळेत दररोज हजर राहावे लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details