मुंबईगणरायाचे आगमन आज होत आहे. आहे. याअनुषंगाने गणपती मंडळ तसेच महापालिका Mumbai Municipal Corporation आणि पोलीस Mumbai Police यंत्रणा, आपत्तीकालीन यंत्रणा, आरोग्य यंत्रणा एकमेकांच्या संपर्कात आहेत. विशेषतः गणपती मंडळ Ganeshotsav Mandals आणि पोलीस यांची मोठी जबाबदारी आहे की, आगमनासाठी मोठी गर्दी होत असल्याने चोख बंदोबस्त आणि सतर्कता Rules announced जरुरी आहे.
गणेश मंडळाचे नियोजन गणरायाची प्रतिष्ठापना अवघी काही तासांवर येऊन ठेपला आहे. Ganeshostav 2022 सर्व गणेश मंडळ उत्सव समितीने सर्व मंडळांनी आपापल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लालबागचा राजा चिंतामणी गणपती अशा मोठ्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीचा आवाका फार मोठा असतो. Mumbai Municipality त्यामुळे गणेश मंडळाच्या समितीने या संदर्भात दक्ष राहून सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत. Ganesh Festival 2022 अशा मोठ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी विशेष सुविधा विशेष ॲम्बुलन्स सुविधा याबद्दल देखील त्यांनी जय्यत तयारी केली आहे. पोलीस, महापालिका, फायरब्रिगेड संबंधित यंत्रणेच्या सोबत उत्सव समित्या समन्वय करत आहे.
पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त, वाहतुकीचे असे असेल नियोजनमुंबईत मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मागणी टी जंक्शन आणि गणेश घाट पवई या महत्वाच्या विसर्जन ठिकाणी वाहतूक पोलिसांचे नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. मुंबईत वाहतूक सुरळीत ठेवत प्रवाशांची गैरसोय टाळण्याचे एक मोठे आव्हान मुंबई वाहतूक पोलिसांसमोर आहे. Ganesh Festival 2022 याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहरातील ७४ रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. तसेच ५७ रस्त्यांवर मालवाहू अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ११४ ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात दुपारी १२ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांनी जरी केलेल्या अधिसूचना अंमलात राहणार आहेत. गणेश विसर्जनादरम्यान वाहतुकीचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी निरीक्षण मनोरे देखील उभे करण्यात येत आहेत.