महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई : विद्युत वाहनांना 'अच्छे दिन'.. पालिका, बेस्टकडून चार्जिंग स्टेशन उभारण्यास सुरुवात - बेस्ट चार्जिंग स्टेशन मुंबई

राज्य सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( BMC and best bus service charging station ) यांनी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद ( Best bus service electric vehicles ) देत मुंबई महापालिकेसह बेस्टने त्याला प्रतिसाद देत त्याची ( Best bus service charging station in mumbai ) अंमलबजावणी सुरू केली आहे. बेस्टने इलेक्ट्रिक वाहने ( Electric bus mumbai ) घेण्यास सुरुवात केली आहे. पालिका तसेच बेस्टने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यास ( Electric vehicle charging station ) सुरुवात केली आहे.

BMC and best bus service charging station
बस सेवा

By

Published : Jun 19, 2022, 8:29 AM IST

मुंबई - राज्य सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( BMC and best bus service charging station ) यांनी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद ( Best bus service electric vehicles ) देत मुंबई महापालिकेसह बेस्टने त्याला प्रतिसाद देत त्याची ( Best bus service charging station in mumbai ) अंमलबजावणी सुरू केली आहे. बेस्टने इलेक्ट्रिक वाहने ( Electric bus mumbai ) घेण्यास सुरुवात केली आहे. पालिका तसेच बेस्टने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यास ( Electric vehicle charging station ) सुरुवात केली आहे. या चार्जिंग स्टेशनवर आपले वाहन चार्जिंग करता येणार असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा -Corona Update India : नाकाद्वारे देण्यात येणारी कोरोना लस लवकर होणार उपलब्ध, देशात 24 तासांत १३ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण

विद्युत वाहन धोरण -महाराष्ट्र राज्याने नुकतेच नवीन विद्युत वाहन धोरण २०२१ जाहीर केले आहे. २०२५ पर्यंत राज्यात नव्याने नोंद होणाऱ्या वाहनांपैकी १० टक्के वाहने ही विद्युत आधारीत वाहने असतील, अशी राज्य शासनाची अपेक्षा आहे. या धोरणानुसार मुंबईतील पहिले सार्वजनिक विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन दादर (पश्चिम) मधील कोहिनूर स्क्वेअर इमारत स्थित बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वाहनतळावर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यासोबत, इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी नवीन २८ केंद्रे उभारण्यात येणार आहेत. पालिकेने ही स्टेशन बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली असून पुढील सहा महिन्यात ते काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. या केंद्रांकडे २५ किलोव्हॅट क्षमतेची स्टेशन असतील. सध्या एका इलेक्ट्रिक मध्यम आकाराच्या वाहनास चार्जिंगसाठी सुमारे २ तासाचा कालावधी लागतो. या चार्जिंगच्या आधारे ही वाहने १८० ते २०० किमीपर्यंत प्रवास करू शकणार आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंग -मुंबईत सध्या सहा चार्जिंग स्टेशन असून यात आणखी वाढ केली जाणार आहे. मुंबईला स्वच्छ - सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. मुंबईतील गाड्यांची संख्या पाहता १ हजार ५०० चार्जिंग स्टेशनची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले असून त्यासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण तयार केले आहे. मुंबई पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत नवीन खासगी इमारतींमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंग तयार केले जाणार आहे. या पार्किंगसाठी एकूण वाहनतळाच्या २० टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्याचे ठरले आहे.

बेस्ट ३३० चार्जिंग स्टेशन उभारणार -सध्या बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या इलेक्ट्रिक तर भाडेतत्त्वावरील ३८६ ई-बसेस आहेत. २०२३ पर्यंत इलेक्ट्रिक बसेसचा ताफा तीन हजारांच्या घरात असेल. २०२८ पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक बसेसचा समावेश बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात होणार आहे. बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगसाठी पाच ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले असून, ८६ पॉइंट्स उपलब्ध करण्यात आले आहेत. भविष्यात चार्जिंग स्टेशनची कमतरता भासू नये, यासाठी बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला असून, ३३० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित आहे. बेस्टच्या चार्जिंग स्टेशनवर मुंबईकरांना आपली वाहने चार्ज करता येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

अग्निसुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा -पालिकेसह ‘बेस्ट’, महावितरण, टाटा, अदानी या सारख्या वीज क्षेत्रातील कंपन्यांसोबत या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कामाला लागली आहे. मुंबई पालिकेने पर्यावरण खात्यांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. चार्जिंग स्टेशनची व्यवस्था पुरवितानाच तिथे अग्निसुरक्षा असावी, अशी काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी बेस्ट, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची उपसमिती नेमण्यात आली आहे. चार्जिंग स्टेशन बांधताना तिथे अग्निसुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे, असे उपायुक्त सुनील गोडसे यांनी सांगितले.

हेही वाचा -Todays Bitcoin Rate : गुंतवणूकदारांना अब्जावधींचा फटका.. बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर.. २ लाखांनी दर झाले कमी

ABOUT THE AUTHOR

...view details