महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई महापालिकेची नवी नियमावली जाहीर; आता 'या' वेळेत सुरु राहणार दुकाने - BMC allows markets shops to function news

मुंबई महानगरपालिकेने शहरातील दुकानांसाठी सुधारित नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार आता नियमित वेळेप्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पालिकेकडून यावेळी काही अटींचा उल्लेख करण्यात आला आहे.

mumbai mumnicipal news
मुंबई महानगरपालिका

By

Published : Jun 9, 2020, 4:34 PM IST

मुंबई - महापालिकेकडून एक नवी मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत मार्केट परिसर आणि मार्केटसह दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, ही दुकाने सोमवार ते शनिवार या दिवसात सुरु राहणार आहेत. महापालिकेने या नव्या नियमावलीत मात्र मार्केट कॉम्पेक्स आणि मॉल्स बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा...शताब्दी रुग्णालयातून गायब झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह सापडला रेल्वे स्थानकात

राज्य सरकारने 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत अनेक निर्बंध शिथील केले आहेत. दरम्यान मुंबई महापालिकेने एक सुधारित नियमावली जाहीर केली असून दुकानांना आता नियमित वेळेप्रमाणे सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेकडून यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र, यावेळी काही अटींचा उल्लेख करण्यात आला आहे.

पालिकेच्या नियमावलीत सर्व मार्केट, मार्केट परिसर, दुकाने पूर्ण वेळ सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पालिकेच्या या सुधारित नियमावलीत सर्व दुकाने आणि मंडई सोमवार ते शनिवार पूर्ण वेळ सुरु राहणार आहेत. यामधून मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सला वगळण्यात आले आहे. तसेच खुल्या जागेतील व्यायामाची साधने, ओपन जिम, गार्डन, प्ले एरिया बंद राहतील.

मुंबई महापालिकेने यावेळी काही अटींचा उल्लेख केला आहे. राज्य सरकारने याआधी लावलेला सम-विषयचा नियम पालिकेने कायम ठेवला आहे. त्यामुळे मुंबईत आधीच्या नियमाप्रमाणे रस्ते, गल्ली, परिसरात असणारी एका बाजूची दुकाने सम-विषम पद्धतीने सुरु असतील. नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी मार्केट तसेच दुकान मालकांनी सहभागी होऊन योग्य ती व्यवस्था करावी तसेच सोशल डिस्टन्सिंग आणि वाहतुकीची व्यवस्था करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details