महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BMC action on Millenaire Studio : मढ येथील 'त्या' वादग्रस्त स्टुडिओवर मुंबई महापालिकेकडून कारवाई - मिलेनियर स्टुडिओवर महापालिकेची कारवाई

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री अस्लम शेख व आदित्य ठाकरे यांना टार्गेट करत मालाड मढ येथे बांधण्यात आलेला मिलेनियर स्टुडिओ बेकायदेशीर असल्याचे सांगता कारवाईची मागणी केली ( Millenaire Studio land scam ) होती. मुंबई महापालिकेने या स्टुडिओला बंद करण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर जिल्हा सागरतटीय नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आज पालिकेच्या पी उत्तर विभागाने तडक कारवाई ( BMC action on Millenaire Studio ) केली.

BMC action on Millenaire Studio
मिलेनियर स्टुडिओ

By

Published : Sep 13, 2022, 3:18 PM IST

Updated : Sep 13, 2022, 4:53 PM IST

मुंबई - भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री अस्लम शेख व आदित्य ठाकरे यांना टार्गेट करत मालाड मढ येथे बांधण्यात आलेला मिलेनियर स्टुडिओ बेकायदेशीर असल्याचे सांगता कारवाईची मागणी केली ( Millenaire Studio land scam ) होती. मुंबई महापालिकेने या स्टुडिओला बंद करण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर जिल्हा सागरतटीय नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आज पालिकेच्या पी उत्तर विभागाने तडक कारवाई ( BMC action on Millenaire Studion ) केली.

एक हजार कोटींचा घोटाळा -मौजे एरंगळ, बोरिवली मालाड मढ येथे मिलेनियर सिटी स्टुडिओ एलएसपी यांना सहा महिन्यांसाठी शूटिंगसाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने परवानगी दिली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ उभारल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मढ मार्वे येथील सीआरझेड जमिनीवर अनधिकृत स्टुडिओचे बांधकाम करण्यास अस्लम शेख यांनी परवानगी दिली होती. अस्लम शेख यांनी यामधून एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला ( Millenaire Studio in Malad Madh in land scam ) आहे.

महापालिकेकडून नोटीस -या प्रकरणी सोमय्या यांनी २३ ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर तसेच बेकायशीर स्टुडिओ वर कारवाईची मागणी केली आहे. सोमय्या यांनी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी व आमदार अतुल भातखळकर यांच्यासह स्टुडिओला भेट देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पालिकेने शूटिंग तात्काळ बंद करून त्याचा इतर सर्व वापर बंद करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी नोटीस मुंबई महापालिकेकडून बजावली होती.

तडक कारवाई - या प्रकरणी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी पालिकेच्या पी उत्तर विभागाचे सहाय्य्क आयुक्त यांना ७ सप्टेंबर २०२२ रोजी एक पत्र दिले आहे. यात पालिकेने या स्टुडिओला तात्पुरती परवानगी दिली आहे. मात्र ही जागा सीआरझेड ३ मध्ये येत असल्याने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऍथॉरिटी यांची परवानगी घेतलेली नाही. यामुळे तात्पुरती दिलेली परवानगी रद्द करून बांधकाम निष्कासित करावे. आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे आदेश जिल्हा सागरतटीय नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांनी दिले आहेत. त्यानुसार आज या स्टुडिओवर पालिकेने तडक कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्य्क आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

Last Updated : Sep 13, 2022, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details