मुंबई - टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा रविवारी मुंबईजवळ एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. सायरस मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला कारने परतत होते. या अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेला ब्लाइंड स्पॉट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण, या अपघाताचा तपास करणाऱ्या पालघर पोलिसांनी महामार्गावर असलेल्या 'ब्लाइंड स्पॉट्स'चाही उल्लेख केला आहे.
अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची माहिती -पालघरचे एसपी बाळासाहेब पाटील यांनी मुंबई-अहमदाबाद रोडवर अनेक ठिकाणी आढळलेल्या ब्लाइंड स्पॉट्सचा उल्लेख केला. ते म्हणाले की, "हा मुद्दा ब्लाइंड स्पॉट एलिमिनेशन कमिटीकडे मांडण्यात आला आहे. NHAI हे 'ब्लाइंड स्पॉट्स' नष्ट करण्यासाठी काम करत आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ओव्हरस्पीडिंगमुळे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पालघरचे एसपी बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. प्राथमिक तपासात नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, वेग जास्त असल्याने गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही.