मुंबई - एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. हा संप आता चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्या शासकीय निवासस्थानावर आज काळी शाई फेकण्यात आली. या प्रकरणी जनशक्ती संघटनेच्या (Janshakti Sangathan workers protesting) चार ते पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- एसटी कर्मचारी संप चिघळला -
राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावी, अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, सरकार ही मागणी मान्य करायला तयार नाही. याबाबत अभ्यास करण्यासाठी एक समितीही नेमण्यात आली आहे.
राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांची अनेकवेळा एसटी कर्मचारी संघटनांशी चर्चा झाली. मात्र, तरीही अजून तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कर्मचारी संपावर ठाम आहेत. या संपात सहभागी झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे.