मुंबई - महावितरणच्या महत्वाच्या पदावर नियुक्त करण्यासाठी विजमंत्र्यांनी थोटवे या अधिकाऱ्यानंकडून आर्थिक गैरव्यवहार केला आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केला आहे. थोटवे हे तीन वेळा पासून संचालक पदावर कार्यरत आहेत. महावितरणच्या इतिहास पहिल्यांदाच थोटवे हे 3 वेळा निवडून आले आहेत. त्यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला आहे. मात्र, अजून पर्यंत ती रिक्त जागा सरकारने भरलेली नाही आहे. पुन्हा एकदा थोटवे यांना त्याच पदावर रुजू करावे यासाठी वीज मंत्र्यांनी सगळे नियम डावलून पुन्हा एकदा त्यांना पदावर रुजू करण्यासाठी जाहिरात दिली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे असे आमचे ठाम मत आहे.
राज्याच्या विजमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत आर्थिक गैरव्यवहार केला - भाजप प्रवक्ते विश्वास पाठक - ऊर्जा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप
राज्याच्या विजमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केला. यासगळ्या प्रकरणात खूप मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याचे ते म्हणाले.
यासगळ्या प्रकरणात खूप मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे आणि हा गैरव्याहर हा एखाद्या IPS लेव्हल वरच्या अधिकाऱ्यांची बदली किंवा त्यांना पदावर रुजू करण्यासाठी पैशांचा गैरव्याहर केला जातो त्याच्याहुन अधिक रक्कमेचा हा गैरव्यावहार झाला आहे. याचे पुरावे आम्ही तुम्हांला लवकरच देऊ असे विश्वास पाठक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने राज्याला ATM कार्ड गत वापरण्याचा घाट घातला आहे. हे सरकार खर तर चुकून आले आहे. त्यामुळे राज्याला आपण किती प्रमाणात आणि कसे लूट शकतो यावर या सरकारचे काम चालू आहे, त्यामुळे आपण पाहू शकतो की कशा प्रमाणात मोठा भ्रष्टाचार होत आहे. राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी एक स्वच्छ प्रतिमेच्या असीम गुप्ता या अधिकाऱ्यांची बदली केली, त्यांची बदली का केली गेली याचे उत्तर मंत्र्यांनी दिले पाहिजे, असे विश्वास पाठक म्हणाले.