महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपचा मोर्चा चिरडला; कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड - bjo morcha mumbai

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

भाजपचा मोर्चा
भाजपचा मोर्चा

By

Published : May 25, 2022, 3:51 PM IST

मुंबई - ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

भाजपचा मोर्चा
राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह 13 महापालिकेच्या निवडणुकीत जातीप्रवर्ग सोडत 31 मे पर्यंत काढण्याचे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणाविना या निवडणुका होणार आहेत. राज्य सरकारच्या करंटेपणामुळे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या निषेधार्थ आज भाजपच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालय ते मंत्रालय दरम्यान ओबीसी समाजाचे नेते योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार होता. भाजप नेते, ओबीसी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

दुपारी दीड वाजता हातात निषेधाचे फलक, सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चाला सुरुवात झाली. मात्र, पोलिसांनी भाजप कार्यालय परीसरातच आंदोलन कर्त्यांची धरपकड केल्याने वातावरण तंग झाले होते. चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, प्रवीण दरेकर अटकेत आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आदी सहभागी झाले होते. या सर्वाना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक गोधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

ताब्यात घेतलेल्या सर्वांना नरिमन पॉईंट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महिला पदाधिकाऱ्यांचाही मोठा सहभाग होता. सरकारची दडपशाही ओबीसी आरक्षणा बाबत बोलू देत नाही लोकशाही मार्गाने आंदोलन या माध्यमातून दडपण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सरकारची ही दडपशाही कदापि सहन करणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

हेही वाचा -आमची हक्काची जागा कोणालाही देणार नाही; संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details