मुंबई -शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे ( shiv sena rebel MLA ) महाविकास आघाडी सरकारवर अल्पमताची टांगती तलवार ( Mahavikas aghadi government in trouble ) आली आहे. तरी भाजप सावध भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केल्यास गोची होऊ नये, यासाठी आसन व्यवस्थेत सध्या तरी कोणताही बदल करू नका, अशी मागणी भाजपकडून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारीयांची मंगळवारी रात्री भाजप नेत्यांनी भेट घेतल्याने राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( chief minister uddhav thackeray ) यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. त्यासंबंधीचे पत्र राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता ( government likely to run in Supreme Court ) आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकासआघाडी सरकारला उद्या बहुमत चाचणी द्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी होणाऱ्या अधिवेनादरम्यान, सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची प्रधान सचिवांची भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज भेट घेतली. विधानसभेतील आसन व्यवस्थेत कोणताही बदल करू नका, अशी मागणी उपाध्यक्षांकडे केल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ( sudhir mungantiwar ) यांनी सांगितले. तसेच पुरेशी व्यवस्था ठेवण्याची विनंतीही केल्याचे ते म्हणाले.