मुंबई- कोरोना लसींचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी भाजपावतीने राज्य सरकार विरोधात चर्चगेट रेल्वे स्थानकासमोर रेलभरो आंदोलन करण्यात आले भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन करण्यात आले आहे. तसेच विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी चर्चगेट ते चरणीरोडपर्यंत प्रवास केला आहे.
मुंबईत भाजपाचं रेलभरो आंदोलन; भाजप कार्यकर्त्यांची धरपकड कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बंद करण्यात आलेली लोकल रुळावर धावू लागल्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकलचा प्रवास अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे सर्व सामान्य मुंबईकरांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लोकल सेवा सुरू करावी यामागणी साठी भाजपाच्या वतीने आज रेल भरो आंदोलन करण्यात आले. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवास करण्याची मुभा मिळावी अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे. याप्रसंगी भाजपा नेते व कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषबाजी करण्यात येत आहे.
लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी!, ही आमची जुनी मागणी आहे. आता मा. न्यायालयाने याबाबत सरकारला सांगितलं आहे. आम्ही विचारतो, ते राजकारण वाटत असेल, परंतु मा. न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का? असा प्रश्न सुद्धा प्रवीण दरेकर यांनी सरकारला विचारला आहे.
भाजपा कार्यकर्त्यांची धरपकड, माध्यमप्रतिनिधींना धक्काबुक्की-
लोकल सुरू करण्याचा मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे नेते मुंबईतील वेगवेगळ्या रेल्वेस्थानकावर रेल भरो आंदोलन करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी स्टेशनबाहेर मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनातक केला होता. यावेळी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करत रेलभरो आंदोलन करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर चरणी रोड स्टेशनमध्ये आंदोलनादरम्यान पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे.