मुंबई -दिव्य कशी भव्य काशी या उपक्रमाअंतर्गत काशी विश्वनाथ म्हणजेच वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन आणि लोकार्पण ( Kashi Vishwanath Corridor Inauguration ) करण्यात आले. त्यानिमित्त पक्षाचे कार्यकर्त्यांनी देशभरात आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. या निमित्ताने साकीनाका असल्फा येथील प्रसिद्ध महेश्वरी मंदिरात भाजपाच्या वतीने महादेवाला दुग्धभिषेक मंत्रोपचारात पूजन करण्यात आले. यावेळी साधू महंत यांनी शंखनाद, घंटा नाद तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून हा उत्सव जल्लोषात साजरा केला.
8 मार्च 2019 रोजी झाले होते हस्ते भूमीपूजन -
सुमारे 339 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीशी जोडणारे सगळे मार्ग सहजतेने जोडण्याचे काम या प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले आहे. हा प्रकल्प आता सुमारे 5 लाख चौरस फूट एवढ्या मोठ्या क्षेत्रावर पसरला आहे, तर पूर्वीची जागा फक्त 3000 चौरस फूट इतकी मर्यादित होती. कोविड महामारी असूनही, प्रकल्पाचे काम नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण झाले आहे. याची सुरुवात 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन करुन झाली होती. या प्रकल्पाची संरचना अशा तऱ्हेची करण्यात आली आहे, जेणेकरुन, वृद्ध लोक आणि दिव्यांगांना इथे जाणे सुलभ होईल. त्यात रेंप, एस्केलेटर्स आणि इतर आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.