मुंबई -काँग्रेसच्या आंदोलनाच्या हाकेनंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर जमलेल्या भाजपा कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आज (सोमवारी) विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय नाना पटोले यांच्या बंगल्याबाहेरून काँग्रेस कार्यकर्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्या बाहेरही मोठा पोलीस फौज फाटा तैनात आहे.
नाना पटोले यांना पोलीस अडवतानांची दृश्य काँग्रेसचे दिंडी आंदोलन सुरू झाले होते. मात्र नाना पटोलेंनी नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून हे आंदोलन स्थगीत केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने भाजपाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घराजवळून वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांची भजन आंदोलन दिंडी काढण्यात आली होती. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एका मातेच्या विरोधात अपशब्द काढून संपूर्ण राज्याचा आणि देशाचा अपमान केला आहे, समस्त माता-भगिनींचा हा अपमान आहे. या विरोधात जोरदार आंदोलन करणार आहोत. शिवाय शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचे वारकरी संप्रदायाचे नेते विठ्ठल पाटील यांनी सांगितले आहे.
सागर निवास्थानी पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड
देशात करोना पसरवायला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने मोदी यांनी माफी मागावी यासाठी मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे आज मुंबईमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या सागर या शासकीय बंगल्याबाहेर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. नानांच्या या इशाऱ्याला गांभीर्याने घेत त्याच पद्धतीने त्याला उत्तर देणार असल्याचे भाजपा नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी ठरवले होते. त्या अनुषंगाने आज दोन्ही बाजूचे कार्यकर्ते सकाळपासूनच देवेंद्र फडणीस यांच्या निवासस्थानी येण्यासाठी सज्ज झाले. सकाळी ११ वाजता आंदोलन करणार असल्याची घोषणा नाना पटोले यांनी केली होती. परंतु पहाटे ८ वाजल्यापासूनच दोन्ही बाजूचे कार्यकर्त्यांनी तिथे पोहचण्यासाठी रणनीती आखली होती. याच कारणास्तव सकाळपासूनच दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक समस्या निर्माण झाली. एकीकडे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी तर दुसरीकडे ट्रॅफिकमुळे होणारा हॉर्नचा कर्कश आवाज सगळीकडे पसरला होता.
प्रत्येक वाहनाची कसून चौकशी
दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेल्या विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे येणाऱ्या प्रत्येक गाडीची सकाळपासूनच कसून तपासणी करण्यात येत होती. टॅक्सी असो, दुचाकी असो, बस असो, खाजगी वाहन असो, सरकारी बस असो प्रत्येक वाहनांची पोलीस कसून तपासणी करत होते. त्यासाठी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात झाले, त्याचबरोबर काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांना अनेक ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारणास्तव दक्षिण मुंबईमध्ये मलबार हि कडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक निर्माण झाले. एक - एक किलोमीटर पर्यंत ट्रॅफिकच्या लांबच लांब रांगा इथे बघायला भेटल्या. त्यातच या समस्येमुळे लोकांचा रोष सुद्धा प्रकट झाला. कोणी सरकारला, कोणी विरोधकांना तर कोणी पोलिसांना या बाबत दोष देत होते.
हेही वाचा -Goa Assembly Election 2022 : भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेंनी थिवी मतदार संघात बजावला मतदानाचा हक्क