महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

साकीनाका घटनेतील आरोपींना लवकर फाशी द्या- महिला शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी - shweta parulkar

मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी महिला शिष्टमंडळाने राज्यपालांकडे विविध मागण्या केल्या आहेत.

भाजप महिला शिष्टमंडळ
भाजप महिला शिष्टमंडळ

By

Published : Sep 13, 2021, 8:07 PM IST

मुंबई- महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महिलांवरील वाढते निर्घृण अत्याचार, गुन्हेगारांचे वाढते मनोबल तसेच महिलांच्या मनातील वाढती असुरक्षितता याबाबत मुंबई भाजपा महिला शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली. साकीनाका येथे झालेल्या निर्घृण गुन्ह्यातील बलात्काऱ्यांना लवकरात लवकर फाशी शिक्षा देण्याची मागणी भाजपा महिला शिष्टमंडळाने केली आहे.


मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देण्यात आले आहे.

हेही वाचा-Sakinaka Rape Case : अशा गुन्ह्यात राजकारण करू नका, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने टोचले भाजपचे कान

या आहेत निवदेनात मागण्या-

  • निवेदनात महाराष्टात शक्ति कायदा लागू केला जावा, अशी मागणी करण्यात आली.
  • महाराष्ट्र सरकारने विशेष विधानसभा सत्र आयोजित करुन शक्ती कायदा लवकरात लवकर पास करावा.
  • मुंबईमधील साकीनाका येथे झालेल्या निर्घृण गुन्ह्यातील बलात्काऱ्यांना लवकरात लवकर फाशी दिली जावी.
  • तसेच, भाजपा शासन काळात कार्यान्वित केलेली सीसीटीवी कार्यप्रणाली अधिक बळकट केली जावी अशी मागणी भाजपा महिला शिष्टमंडळाने केली.

हे होते भाजपा महिला शिष्टमंडळात


हेही वाचा-जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचे वाजले बिगूल; 5 ऑक्टोबरला मतदान

भेटीदरम्यान महिला शिष्टमंडळात आमदार विद्या ठाकूर, आमदार मनीषा चौधरी, आमदार भारती लवेकर, शलाका साळवी, मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा शीतल गंभीर, मुंबई भाजपाच्या मिडिया प्रभारी श्वेता परुळकर, मुंबई भाजपा युवती प्रमुख पल्लवी सप्रे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

हेही वाचा-ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात जाणार, निवडणुका झाल्यास रस्त्यावर उतरू - आमदार प्रकाश शेंडगे

ABOUT THE AUTHOR

...view details