महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार.. काँग्रेस उमेदवार रजनी पाटील बिनविरोध - राज्यसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस बिनविरोध

काँग्रेसच्या आवाहनामुळे भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. भाजपने माघार घेतल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.

Rajya Sabha by-election
Rajya Sabha by-election

By

Published : Sep 27, 2021, 3:42 PM IST

मुंबई - राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस पक्षाने केलेल्या आवाहनाला भाजपने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काँग्रेसच्या आवाहनामुळे भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. भाजपने माघार घेतल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.

राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त जागेसाठी निवडणूक -


काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, भाजपच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते. एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला होता. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करत भाजप पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचारविनिमय केला आणि भाजपने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला.

हे ही वाचा -Audio Clip Viral : आरोग्य सेवा भरतीत घोटाळा.. पदासाठी 15 लाखांपर्यंत बोली, ओबीसी नेत्याचा आरोप

त्यानुसार मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचे चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details