'पदवीधर निवडणुकीतील अपयशातून सावरून भाजप ग्रामपंचायतीत चांगलं यश मिळवेल' - भाजप पदवीधर निवडणूक
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एकटा असल्याने त्यांच्यासमोर तिन्ही पक्षाचे आव्हान असणार आहे. मात्र तळागाळातील पन्ना प्रमुखांनी गावाकडच्या प्रश्नांना घेऊन, गावा-गावात पोहचण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नक्कीच पदवीधर निवडणुकीतील अपयशातून आम्ही या ग्रामपंचायत निवडणुकीत यशस्वी होऊ, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.
मुंबई - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. पदवीधर निवडणुकीनंतर आता राज्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्यात असल्याने यावेळी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात केली आहे. त्यात भाजपला पदवीधर निवडणुकीत मिळालेल्या अपयशाने भाजपने पंचायत निवडणुकीत कंबर कसली आहे.
तिन्ही पक्षांचे आव्हान -
या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यास निवडणुकीत भाजप एकटी पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक निवडणुकीत तीन पक्षाची एकत्र मूठ बांधायची कशी? याचे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर असणार आहे. त्यातच भाजप एकटा पक्ष असल्याने त्यांच्यासमोर देखील तिन्ही पक्षाचे आव्हान आहे मात्र तळागाळातील पन्नाप्रमुखांनी गावाकडच्या प्रश्नांना घेऊन, गावा-गावात पोहचण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे नक्कीच पदवीधर निवडणुकीचे अपयशातून आम्ही या ग्राम पंचायत निवडणुकीत यशस्वी होऊ, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.