मुंबई -मालाड येथील उद्यानाला टिपू सुलतानचे ( Tipu Sultaan Name For Malad Park ) नाव दिल्याने वाद उफाळून आला आहे. टिपू सुलतान नावावरून राज्यातील आणि मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने सत्ताधारी शिवसेनेला ( BJP Critisize Shivsena over Renameing ) लक्ष केले आहे. आज पुन्हा भाजपाने स्थायी समितीमध्ये वरळी येथील जांभोरी मैदानावर महात्मा गांधीजींच्या नावाचा ( Warali Ground Mahatma Gandhi Name Board ) फलक दहा दिवसात न लावल्यास गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
'तर आंदोलन करू' -
मालाडमधील मैदानाला अनधिकृतरित्या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे देणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला मात्र, वरळी बी.डी.डी. चाळीतील जांभोरी मैदानावर महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक लावण्याचेदेखील भान उरले नाही. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते मैदानाचे लोकार्पण झाल्यावरही सत्तेसाठी धर्मांध शक्तींशी हातमिळवणी करणाऱ्यांना महात्म्याचा विसर पडावा, हे दुर्दैवी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आज स्थायी समितीत माहितीचा मुद्दा उपस्थित करत केली. मैदानात दहा दिवसांमध्ये महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक न लावल्यास भाजपतर्फे गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.