मुंबई - भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून एकनाथ खडसे यांच्याविरोधात कुभांड रचत आहे. मात्र, खडसे निर्दोष आहेत. या सर्व प्रकरणातून ते बाहेर येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -डॉक्टर नव्हे सैतान... इस्लामपूरमध्ये मृतदेहावर केले तब्बल २ दिवस उपचार
- खडसेंना राष्ट्रवादीत सन्मानाने घेतल्याने भाजप चिडले -
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत चुकीच्या पद्धतीने अडकवत आहेत. मात्र, एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणातून ते बाहेर येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे यांच्याविरोधात भाजपकडून कुभांड रचले जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
- एकनाथ खडसेंच्या प्रकरणात तथ्य नाही -