मुंबई - शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आरोपींना जामीन मिळाल्याने भाजपा आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे पोलीस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंदोलकांची समजूत घातल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नौदल अधिकारी मारहाण; पोलीस सहआयुक्तांच्या आश्वासनानंतर भाजपाचे आंदोलन मागे - bjp protest for retired navy officer beat case
आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आदोलन करण्यात आले. यावेळी, पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रवीण दरेकर आणि आंदोलकांची भेट घेतली. आवश्यक त्या कलमांचा समावेश करून कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले.
आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार दरेकर यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आदोलन करण्यात आले. यावेळी, पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दरेकर आणि आंदोलकांची भेट घेतली. आवश्यक त्या कलमांचा समावेश करून कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले. त्याचवेळी प्रवीण दरेकर यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन आला. त्यांनीही आंदोलकांच्या मागणीची दखल घेतली. आम्ही सीसीटीव्ही पाहत आहोत. कलम ४५२ अंतर्गत कारवाई करता येईल, असे म्हणत आम्ही पुढील कारवाई करू, असे सहआयुक्त विश्वास पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा-शिवसेनेने आपली मूळ भूमिका बदलत गुंडाराज सुरू केलंय - प्रवीण दरेकर