महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात उद्या भाजपचे 105 आमदार उतरणार; प्रविण दरेकरांची घोषणा - pravin darekar news

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होण्यासाठी उद्या आझाद मैदानावर राज्यभरातील भाजपचे 105 आमदार आणि खासदार येणार असल्याची माहिती विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी दिली आहे. सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Workers Strike) सुरू आहे.

pravin darekar
प्रविण दरेकर

By

Published : Nov 10, 2021, 7:19 PM IST

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत भाजप कर्मचाऱ्यांच्या पाठीशी (BJP support ST Workers Strike) उभा आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उद्या आझाद मैदानावर राज्यभरातील भाजपचे 105 आमदार आणि खासदार येणार असल्याची माहिती विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी दिली आहे. सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Workers Strike) सुरू आहे. या आंदोलनात आता भाजपही उतरले आहे.

हेही वाचा -ST Strike : सुधीर मुनगंटीवार म्हणाले एसटीचे विलीनकरण शक्यच नाही; व्हिडिओ होतोय व्हायरल

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा ही प्रमुख मागणी घेऊन सरकार विरुद्ध आझाद मैदानावर आज एसटी कर्मचाऱ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात एसटीचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. महामंडळाला शासनात विलीनीकरण करण्याचे लेखी पत्र घेऊन परिवहन मंत्री येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविन दरेकर यांनी सरकारला दिला आहे.

  • तोपर्यंत संप मागे घेणार नाही - दरेकर

भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत, मंत्रालयावर आज मोर्चा काढणार होते. मात्र, भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमैया यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले. त्यानंतर आझाद मैदानावर भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत घेऊन सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी किरीट सोमैया, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, प्रविण दरेकर आणि गिरीश महाजन उपस्थित होते.

यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकरवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकार जोपर्यंत एसटी महामंडळाला शासनात विलीनीकरणाचे लेखी आश्वासन आम्हाला देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. एसटी कामगारांनी शासनाच्या दबावाला बळी पडू नये, संपूर्ण राज्यातील भाजप नेते तुमच्या पाठीशी उभे आहेत. उद्या एसटीच्या संपात भाजपचे राज्यभरातील 105 आमदार आणि खासदार उतरणार असल्याची माहिती प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

  • ...तोपर्यंत मुंबई आम्ही सोडणार नाही - पडळकर

आझाद मैदानावर गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं की, जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत मुंबई आम्ही सोडणार नाही. राज्यभरात 35 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांचे आश्रू पुसण्याची गरज होती. त्यांच्याकडे बघण्याची गरज होती. हे मंत्री अनिल परब अवमान याचिका दाखल करायला निघाले आहेत. कर्मचाऱ्यांवर कारवाई करत आहेत. कर्मचारी मुंबईत येऊ नयेत यासाठी सरकारने प्रयत्न केले, पण तरी तुम्ही आलात, जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई आपण सोडणार नाही, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

  • ...क्या हुआ तेरा वादा? - सोमैया

किरीट सोमैया यांनी सांगितले की, एसटी कामगारांच्या मागण्या आज नाही तर उद्या मान्य तरी होतील, आम्ही शेवटपर्यत कामगारांच्या बाजूने उभे राहणार आहोत. सोमैया यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत म्हणाले की, एक अनिल आत(तुरुंगात) गेले त्यामुळे त्या अनिलचे काम या अनिलला करावे लागत आहे. कारण यांना 100 कोटी वसुली करायची आहे ना? नाहीतर साहेब यांना म्हणतील क्या हुआ तेरा वादा? आम्ही ठरवलं तर मंत्रालयाचा ताबासुद्धा घेता आला असता. मंत्रालयात ते उपस्थित नाही आणि येथे ते येणार नाहीत. ट्रान्सफरच्या ऑर्डरवर सह्या करत होतात का? असा प्रश्न मी परब यांना येथे आल्यावर विचरेल, असा टोलाही अनिल परब यांना सोमैया यांनी लावला आहे.

हेही वाचा -ST Workers Strike : पडळकर, किरीट सोमैयांना पोलिसांनी घेतले ताब्यात; मंत्रालय परिसरात पोलीस बंदोबस्त

ABOUT THE AUTHOR

...view details