मुंबई-राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने लातुरपर्यंत रेल्वेने पिण्याचे पाणी पोहोचवून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रेल्वे आणि टँकरने पोहोचवलेल्या पाण्याचे बिल महाविकास आघाडीने भरल्याचा टोला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत भाजपला लगावला.
मराठवाड्यात 2016 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. यावेळी नागरिक तसेच जनावरांनादेखील पिण्याचे पाणी मिळत नव्हते. अशी परिस्थिती असताना यावेळी राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने लातूरपर्यंत रेल्वेने पिण्याचे पाणी पोहोचवून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रेल्वे आणि टँकरने पोहचवलेल्या पाण्याचे बिल महाविकास आघाडीने भरले असल्याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा टोला लगावला.
हेही वाचा-महाराष्ट्र अर्थसंकल्प : राज्याच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा आधार - श्रीनिवास खांदेवाले
मराठवाड्यात दुष्काळ कायमस्वरूपी सोडवण्यासाठी भाजप सरकारने 'वॉटर ग्रीड' प्रकल्प सुरू केला होता. मात्र, हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याचा भाजपकडून आरोप करण्यात आला आहे.