मुंबई -राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पक्षाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत राज्याच्या प्रश्नावर चर्चा झाली आहे. ही रुटीन भेट होती. अश्या भेटीमध्ये राज्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा होत असते. राहिला प्रश्न सचिन वाझे यांच्या प्रकरणाच्या बाबतीत तर या बैठकीत काहीचं चर्चा झाली नाही. सचिन वाझे यांचा एनआयएकडून तपास केला जात असून यात अनेक गंभीर बाबी उघड होत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी दिली आहे.
'फडणविसांनी गृहमंत्र्यांची घेतलेली भेट रूटीन, वाझे प्रकरणावर चर्चा नाही' - पंकजा मुंडे
राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पक्षाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
सचिन वाझे प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची शंका-
या बैठकीसंदर्भात विविध तर्क वितर्क महाराष्ट्रातील राजकारणात लावले जात होते. राज्यात सचिन वाझे यांचं प्रकरण चांगलंच तापलेल असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देशाच्या गृहमंत्र्यांशी जाऊन भेटतात. ही भेट सचिन वाझे या प्रकरणाबाबत असल्याची शंका राज्यातील राजकारणात होत होती. दरम्यान, या प्रकरणावर भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा-सचिन वाझे प्रकरणावरून सत्ताधारी-विरोधकांध्ये जुंपली