मुंबई - एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या (Former BJP national spokesperson) नूपुर शर्मा यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. आक्षेपार्ह वक्तव्य (Statement) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना आज 25 जून रोजी पायधुनी पोलिस स्टेशनसमोर हजर होणार होते. मात्र, नुपूर शर्मा हे हजर झाल्या नाहीत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या समन्सला नुपूर शर्माकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. लवकरच मुंबई पोलीस नुपूर शर्मा यांना चौकशीसाठी समन्स पाठवणार आहे.
पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. त्यानंतर रझा अकादमीच्या तक्रारीवरून मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी टीव्ही चर्चाच्या दरम्यान नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याशी संबंधित एका घटनेचा उल्लेख केला. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आणि एकच गोंधळ सुरू झाला.