महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Satej Patil : सतेज पाटलांनी उडवली चंद्रकांत पाटलांची खिल्ली; म्हणाले, 'भाजपने इतिहासाची बदनामी...' - भाजपाला पाच हजार वर्षांचा इतिहास चंद्रकांत पाटील

काल-परवा स्थापन झालेल्या पक्षाला ऐतिहासिक परंपरेशी जोडून इतिहासाची बदनामी करू नये, असे परखड मत व्यक्त करत सतेज पाटलांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले ( Satej Patil On Chandrakant Patil ) आहे.

Satej Patil
Satej Patil

By

Published : Apr 20, 2022, 7:00 PM IST

Updated : Apr 20, 2022, 8:10 PM IST

मुंबई -भाजपला पाच हजार वर्षांचा इतिहास असल्याचे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले ( Five Thousand Year History Bjp Chandrakant Patil ) होते. त्यांच्या या वक्तव्याची गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी खिल्ली उडवली आहे आहे. भाजप आधी संविधान मानते का?, याचे उत्तर द्यावे. काल-परवा स्थापन झालेल्या पक्षाला ऐतिहासिक परंपरेशी जोडून इतिहासाची बदनामी करू नये, असे परखड मत व्यक्त करत सतेज पाटलांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले ( Satej Patil On Chandrakant Patil ) आहे.

सतेज पाटील म्हणाले की, जनसंघाची आणि भाजपची स्थापना कधी झाली हे अवघ्या जगाला माहित आहे. तरीही वैभवशाली भारतीय परंपरेशी आणि इतिहासाची आपले नाते जोडू पाहणाऱ्या भाजपने भारतीय इतिहासाची प्रतिमा मलिन करू नये. धार्मिक ध्रुवीकरण याचा प्रयत्न कितीही भाजपने केला तरी तो यशस्वी होणार नाही. या देशातील लोकशाही आणि संविधान भाजप मानते का हा खरा प्रश्न आहे, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.

सतेज पाटलांशी संवाद साधताना प्रतिनिधी

संघाचे योगदान काय? - यापूर्वीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला स्वातंत्र्य लढ्यात सहभाग असल्याचे म्हटले आहे. मात्र, महात्मा गांधींच्या लढ्यामुळे आणि नेतृत्वामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. त्या वेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळी कुठे होती?, अस प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

विरोधकांनी तारखांचे स्वप्नरंजन थांबवावे - राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या अनेक तारखा चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा आता नवनवीन तारखा जाहीर करीत आहेत. पण, विरोधकांनी कितीही तारखा जाहीर केल्या तरीही महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार आपला कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल, असा दावा सतेज पाटील यांनी व्यक्त केला ( Satej Patil On Mahavikas Aghadi Government ) आहे.

हेही वाचा -Prateek Patil : जयंत पाटलांचे सुपुत्र सांगलीतून विधानसभा लढणार?; कार्यकर्त्यांनी केली मागणी

Last Updated : Apr 20, 2022, 8:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details