मुंबई - मुंबईच्या महापौरांबाबत भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar Statement) यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी गृहमंत्री तसेच पोलिसांकडे तक्रार करून आशिष शेलार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर भाजपच्या नगरसेविकांनीही (BJP Corporator) सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांची भेट घेऊन सोशल मीडियावर महापौरांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
प्रतिक्रिया देताना शिवसेना-भाजपच्या नेत्या वरळी येथे मागच्या आठवड्यात मंगळवारी सिलेंडर स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. त्यांच्यावर वेळीच उपचार न झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. या प्रकरणी नायर रुग्णालयातील २ डॉक्टर आणि एका नर्सला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी नायर रुग्णालयातील उप अधिष्ठाता आणि थर्ड पार्टी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या घटनेबाबत बोलताना भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत या प्रकरणी वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश महिला आयोगाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.
किशोरी पेडणेकर यांचे पत्र - शिवसेनेसह भाजपाची तक्रार -
या प्रकरणी आज महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नगरसेविका आणि महिला आघाडीने पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन आशिष शेलार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी महापौरांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पत्र लिहिले आहे. तर याच मुद्द्यावर भाजपच्या नगरसेविकांनी विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन शेलार यांनी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. सोशल मीडियावर महापौरांची बदनामी केली जात असल्याने महापौरांची बदनामी करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.