मुंबई -मुंबईतील रस्त्यांची अवस्था दयनीय असताना कोट्यवधी रुपये खर्च करून सायकल ट्रॅक बनवला जात आहे. भाजपने यावरून आक्रमक पवित्रा घेतला असून मुंबई शहरातील रस्त्यासाठी युटीलिटी कॉरिडोर डेव्हलपर तयार करावे, अशी मागणी भाजप आमदाराने महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबईतील रस्त्यांवरून भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. रस्त्यांच्या कामांवर भाजपने पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरले आहे. भाजप आमदार अमित साटम यांनी पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांची दयनीय स्थितीवर हरकत घेतली आहे. फेरनिविदा काढून रस्त्यांची डागडुजी केली जाते. गेल्या 24 वर्षात 21 हजार रुपये खर्च करूनही रस्त्याची अवस्था वाईट आहे. लिस्टेड इस्पा स्ट्रक्चर कंपन्या राज्य आणि केंद्र सरकारचे काम करतात. मात्र मुंबई महापालिकेचे काम करण्यास रस दाखवत नाहीत. अशा लिस्टेड इन्स्फा स्ट्रक्चर कंपन्यांनाच मुंबईतील रस्त्याचे काम करण्याची अट निविदा प्रक्रियेत घालावी.