मुंबई - उत्तर मुबंई मतदारसंघात युतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रिपाइं (आठवले गट) व रासपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. महायुतीने प्रचाराचे रणशिंग फुंकले, परंतु या प्रकारामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून आले.
मुंबई : महायुतीचा मेळाव्यात रिपाइंसह रासपचे कार्यकर्ते नाराज - rsp
गोरेगावमधील महायुतीच्या पहिल्याच मेळाव्यात रिपाइं कार्यकर्ते आपल्या पदाधिकाऱ्यांना मानपान दिला नाही यामुळे नाराज झाले.
महायुतीचा मेळाव्यात रिपाइं कार्यकर्ते
गोरेगावमधील महायुतीच्या पहिल्याच मेळाव्यात रिपाइं कार्यकर्ते आपल्या पदाधिकाऱ्यांना मानपान दिला नाही यामुळे नाराज झाले. व्यासपीठाखाली रिपाइं व भाजपच्या कार्यकत्यांमध्ये बाचाबाची झाली. मेळाव्यातून नाराज झालेले कार्यकर्ते निघून जात होते. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर घेतल्यानंतर वाद थंड झाला.