मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १४ मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा घेणार ( CM uddhav thackeray 14 may Sabha ) आहेत. याप्रसंगी ते मुख्यमंत्री हा मास्क काढून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून विरोधकांचा समाचार घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या सभेकडे तमाम शिवसैनिकांचे लक्ष लागलेले असताना भाजपने त्यांच्या मुंबई ट्विटर पेजवरून मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली ( BJP ridiculed CM uddhav thackeray ) आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, असे सांगत सध्याच्या महाविकास आघाडीमध्ये या महा विकास आघाडीचे प्रमुख जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरीसुद्धा हे सरकार कोणाच्या जोरावर चालते याच एक व्यंगचित्र यामध्ये दाखवण्यात आले आहे.
काय आहे चित्रात? -या चित्राच्या वरती, "संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे" असे सांगत या चित्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे दूरचित्रवाणी पाहताना दिसत आहेत. या दूरचित्रवाणीवर उद्धव ठाकरे यांच्या १४ मे च्या सभेची जाहिरात सुरू आहे. त्यात, "हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला यायलाच पाहिजे" असे त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे. व त्या खालोखाल साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या.. असे लिहिलेले आहे. या चित्रात महत्त्वाचे म्हणजे शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना, "उद्धवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठांतर कर," असे सांगत आहेत. व त्यावर उद्धव ठाकरे, "होय साहेब," असे म्हणत आहेत. असे संबोधित करण्यात आलेल आहे.