मुंबई -जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला होता. यावेळी काही उपस्थितांनी काश्मीर मुक्तच्या घोषणा दिल्या असल्याचा आरोप, भाजपकडून केला जातोय. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज बुधवारी शिवाजी पार्क येथे स्वातंत्र्यवीर स्मारकात भाजपचे कार्यकर्ते जमले होते. तसेच अभिनेत्री जुही चावला, इतर कलाकार आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. यावेळी 'काश्मीर वेगळा करण्याच्या विचार केलात तर याद राखा' असा इशारा देण्यात आला.
हेही वाचा... लेकीला लक्ष्मी मानणाऱ्या 'त्या' पित्याने जिंकले अशोक चव्हाणांचे मन.. फोन करून केली विचारपूस !
गेट वे ऑफ इंडिया येथे जेएनयुत झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी जमले होते. यावेळी काहींनी काश्मीरचे मुक्त नारे दिले, असा आरोप करण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळ भारतीय जनता पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, शायना एन सी, अभिनेता दिलीप ताहिल यावेळी उपस्थित होते.