मुंबई -विधीमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झाले. याविरुद्ध भाजप कार्यकर्त्यांनी कांदिवली पूर्वमध्ये रस्त्यावर उतरून संतप्त निदर्शने केली. कांदिवली पूर्व पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अटक केली.
हेही वाचा -मुंबई कोरोना अपडेट : दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णांची नोंद, 453 नवे रुग्ण
विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ केल्याचा आरोप करत तालिका अध्यक्षांनी भाजपचे आमदार पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया या १२ आमदारांना निलंबित केले. या पार्श्वभूमीवर कांदिवली पूर्व विधानसभेत भाजपचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन आज सकाळीच रस्त्यावर उतरले. वसुली सरकारचा निषेध असो, ठाकरे सरकार हाय, अशा घोषणा देऊन त्यांनी संतप्त निदर्शने केली. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.