मुंबई- ओबीसी आरक्षण प्रश्नी आज सकाळी भाजपने 'आक्रोश मोर्चा' काढत आंदोलन करण्यात आले. या वेळेस भाजपच्या कार्यालयासमोर शेकडो ओबीसी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी 'सत्ताधारी हे ओबीसी आरक्षणाचे राजकारण करत असल्याची टीका आंदोलकांनी केली. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपच्या ओबीस सेलच्या वतीने या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
ओबीसी आरक्षणप्रश्नी मुंबईत भाजपचा आक्रोश मोर्चा; पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात - जिल्हापरिषद ओबीसी आरक्षण
यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र ओबीसी प्रभारी संजय कुटे आणि तसेच ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केले. या वेळेस या आंदोलनाला भाजपा कार्यकर्त्यांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि यावेळेस भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन भाजपचे कार्यालय ते विधान भवानापर्यंत घेऊन जाण्यासाठी ते निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा मोर्चा मध्येच अडवून त्यांना अटकसुद्धा केली.
![ओबीसी आरक्षणप्रश्नी मुंबईत भाजपचा आक्रोश मोर्चा; पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात bjp obc morcha](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10945006-242-10945006-1615353743027.jpg)
संजय कुटे टिळेकर पोलिसांच्या ताब्यात-
भाजपा ओबीसी मोर्चाद्वारे आज सकाळी आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र ओबीसी प्रभारी संजय कुटे आणि तसेच ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केले. या वेळेस या आंदोलनाला भाजपा कार्यकर्त्यांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि यावेळेस भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन भाजपचे कार्यालय ते विधान भवानापर्यंत घेऊन जाण्यासाठी ते निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा मोर्चा मध्येच अडवून त्यांना अटकसुद्धा केली.