महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Siddhu controversial statement : सिद्धू यांच्याविरोधात भाजपची जोरदार निदर्शने - कर्तारपूर कॉरिडोर

“इमरान माझे मोठे बंधू आहेत. त्यांनी मला खूप प्रेम दिले आहे,” असे ते म्हणाले. काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjyotsingh siddhu) विधानानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Siddhu controversial statement
Siddhu controversial statement

By

Published : Nov 21, 2021, 5:09 PM IST

मुंबई -काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjyotsingh siddhu) यांनी काल पाकिस्तानसंबधी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कर्तारपूर कॉरिडोरसाठी पाकिस्तानात गेलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे मोठे बंधू असल्याचे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज भारतीय जनता पक्षातर्फे घाटकोपर येथे आमदार राम कदम (Ran kadam) यांच्या नेतृत्वाखाली सिद्धू यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच सिद्धू यांच्या पुतळ्याला काळे फासण्यात आले आहे. पुतळ्याला जोडे मारण्यात आले. सिदधूने देशाची माफी मागावी अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली आहे.

सिद्धू यांच्याविरोधात भाजपची जोरदार निदर्शने
काय आहे संपूर्ण प्रकरणकाँग्रेसचे नेते सिद्धू यांचे पाकिस्तानमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी कर्तारपूर कॉरिडोरच्या एका अधिकार्‍याने सिद्धू यांचे स्वागत करताना म्हटले की, “संपूर्ण पाकिस्तान तुमचे स्वागत करतो. या दिवसाची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो,” यावर सिद्धू म्हणाले की, “इमरान माझे मोठे बंधू आहेत. त्यांनी मला खूप प्रेम दिले आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या आधीही पाकिस्तान दौर्‍यावरून वादइम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या शपथविधीला सिद्धू पोचले होते. तिथे त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली होती. यानंतर ते कर्तारपूर कॉरिडोर खुला करण्यासाठी पाकिस्तानमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही गेले होते.हेही वाचा -INS Visakhapatnam : स्वदेशी बनावटीचे आयएनएस विशाखापट्टण आजपासून सेवेत रुजू

ABOUT THE AUTHOR

...view details