महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू - पंकजा मुंडे

भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत सुरू झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष उपस्थित आहेत. विशेष म्हणजे नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती

By

Published : Jun 22, 2019, 12:42 PM IST

मुंबई- भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित आहेत. या बैठकीला सुरूवात झाली आहे.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती
विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, अनिल बोंडे, यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, नेते, मंत्री देखील उपस्थित आहेत. विशेष म्हणजे मंत्रीपदाची शपथ घेतलेले राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. बैठकीत विधानसभेच्या रणनितीवर चर्चा होणार आहे. मित्रपक्षांना द्यायच्या जागा आणि युतीसंदर्भातही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details