मुंबई -भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे गुरुवार दि.११ नोव्हेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. जगत प्रकाश नड्डा यांचे संध्याकाळी साडे सात वाजता अंधेरी (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल- टी २) येथे आगमन झाले. यावेळी मुंबईतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी आमदार अॅड. मंगलप्रभात लोढा, अध्यक्ष मुंबई भाजपा व आमदार अतुल भातखळकर प्रभारी हे उपस्थित होते. जे.पी. नाडा हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते आगामी महापालिका निवडणूकी संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मुंबईत दाखल; कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत फडणवीस म्हणाले होते -
विधान परिषद निवडणूक जाहीर झालेली आहे. लवकरच यासंदर्भात भाजपाच्या स्टेट इलेक्शन कमिटीची बैठक होईल. त्या बैठकीत भाजपाचे विधान परिषदेच्या उमेदवार संदर्भात चर्चा केली जाईल. त्यानंतर ती शिफारस भाजपाच्या केंद्राच्या पार्लमेंट्री बोर्डकडे पाठवू. त्यात ठरल्यानंतर नावाची यादी तयार होईल. त्यासाठी थोडी वाट पाहा असेही देवेंद्र फडणवीस नागपुरात म्हणाले होते. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीच्या यादीबाबत नड्डा हे चर्चा करणार का? याबाबत भाजपासह राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा - 'माझं ट्वीट पुरेस बोलकं, त्याला कशाला उगाच वजन देता'; मलिकांनी केलेल्या आरोपावर बोलताना फडणवीसांना आवरेना हसू