मुंबई- गणेशोत्सव कोकणातला महत्त्वाचा सण आहे. कोकणात चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु. त्यामुळे चाकरणान्यांना कोणत्याही पासची सक्ती करू नये, असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला. यावेळी शरद पवारांच्या संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीवर 'एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद' असे म्हणत राणे यांनी माध्यमांशी बोलताना टोला लगावला.
'ती' मुलाखत म्हणजे एक शरद अन् शिवसेनेचे सगळे गारद, नारायण राणेंचा शिवसेनेवर बाण पुढे बोलताना राणे म्हणाले, की “कोकणात यायला कोकणी माणसाला बंदी घातलेले चालणार नाही. त्याचे आई, वडील, पत्नी गावी असतात. कोकणी माणसांसाठी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. गणपती हे आमचे आराध्य दैवत आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, त्यांना कोणत्याही पासची सक्ती करु नये. कोरोनापासून बचावासाठी प्रत्येक जण आपली काळजी घेईल.” असंही नारायण राणे म्हणाले.
मुंबईत पाच-पाच हजार जणांचे कोरोनामुळे प्राण जातात, राज्यात आठ हजार जण दगावले, हे राज्य सरकारचे अपयश आहे असा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेची सत्ता असूनही सेना मंत्री आणि नेते यांचे ऐकत नाहीत. शिवसैनिकांना विचारत नाहीत, एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद आहेत. मुलाखतीसाठी शिवसेनेकडे माणसंच नाहीत. त्यामुळे शरद पवारांना घेतल्याचेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.
पहिली ज्यांची मुलाखत यायची, ती माहिती गोळा केलेली असायची. यामध्ये स्वत:चे विचार, माहिती असे काय आहे ? असा प्रश्न त्यांनी शिवसेनेला केला आहे. त्याचबरोबर, मुलाखतीत शरद पवार जे बोलतील ते राज्याच्या हिताचे असेल, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.
कोकणात मुंबईकरांमुळे कोरोना व्हायरस वाढला, असे नारायण राणे म्हणाले. तसेच, गणेशोत्सवासाठी कोकणात जायला कोकणी माणसाला बंदीचा आदेश निघालेला नाही. जर बंदीचा आदेश आला, तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.