मुंबई :कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारचा भ्रष्टाचाराचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे असा गंभीर आरोप भाजप खासदार नारायण राणे यांनी केला.
नारायण राणे यांनी आपल्या घरी पत्रकार परिषद घेत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास ठाकरे सरकार अपयशी पडलेलं आहे अशी टीका केली. बाजारपेठांमधील गर्दीचा विचार सरकारने करायला हवा, संचारबंदीचा परिणाम होताना दिसत नाही, त्यामुळे हा लॉकडाऊन सरकारने का केला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
मुंबईच्या आणि राज्यातल्या बाजारपेठांमध्ये गर्दी काही कमी होत नाही, त्यामुळे राज्य सरकारने या बाजारातील गर्दीचा विचार करावा. तसेच रिक्षाचालकांना दीड हजाराची मदत दिली, त्यातून पूर्ण कुटुंबांचं पालन-पोषण होणार आहे का? पाच जणांच्या कुटुंबाचं महिना दीड हजारात कसं भागणार? असा संतप्त सवाल देखील या वेळेस नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला केला आहे. व्यवसाय बंद असताना जीएसटी का सुरू आहेत? असा प्रश्न उपस्थित करत "लॉकडाऊन उठवा, दुकाने सुरू करा, गोरगरिबांचा विचार करा" असे आवाहन यावेळेस नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करत आहात?