महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maneka Gandhi Meets Jitendra Awhad : भाजप खासदार मनेका गांधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीला - माजी खासदार प्रितेश नंदी

भाजपच्या खासदार मनेका गांधी ( BJP MP Maneka Gandhi ) यांनी मुंबई पूर्व, पश्चिम उपनगरात पशुवैद्यकीय दवाखाना व प्राण्यांच्या दफनभूमीला जागा देण्याच्या मागणीसाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांची भेट घेतली ( Maneka Gandhi Meets Jitendra Awhad ). मनेका या भाजप खासदार असल्या तरी त्या पशु हक्क चळवळीचेही काम करतात.

भाजप खासदार मनेका गांधी
भाजप खासदार मनेका गांधी

By

Published : Dec 24, 2021, 5:34 PM IST

Updated : Dec 24, 2021, 7:22 PM IST

मुंबई : भाजपच्या खासदार मनेका गांधी ( BJP MP Maneka Gandhi ) यांनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांची भेट घेतली ( Maneka Gandhi Meets Jitendra Awhad ). पशुवैद्यकीय दवाखाना व प्राण्यांच्या दफनासाठी मुंबई पूर्व पश्चिम उपनगरे येथे जागा निश्चित करण्यासंदर्भात आज भाजपच्या उत्तर प्रदेश सुलतानपूर च्या खासदार मनेका गांधी यांनी गृहनिर्माण मंत्री यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी खासदार प्रितेश नंदीही ( Ex MP Pritish Nandy ) होते.

भाजप खासदार मनेका गांधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीला

म्हाडाकडून दिली जाणार जागा

प्राणीमित्र व खासदार मनेका गांधी यांनी आज मुंबईत मंत्री जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी मुंबईत भेट घेतली. मुक्या प्राण्यांना त्यांच्या निधनानंतर दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये तसेच जनावरांच्या हॉस्पिटल संदर्भामध्ये त्यांनी ही भेट घेतली. याप्रसंगी बोलताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुंबई उपनगरांमध्ये १२०० स्क्वेअर मीटर इतकी जागा ह्या हॉस्पिटलसाठी देण्यात येणार आहे. या जागेवर ५१ हजार स्क्वेअर फूट इतकं बांधकाम केलं जाईल. सहाजिकच मुंबई उपनगरात मुक्या प्राण्यांसाठी हॉस्पिटलची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. हा काही कुठला सरकारी प्रोजेक्ट नाही आहे, तरीही आपण प्राणी मित्र असल्याने या प्रकरणांमध्ये जातीने लक्ष घालून हा प्रोजेक्ट पूर्ण करणार असेही त्यांनी सांगितले.

मंत्री व त्यांची मुलगी ही प्राणिमित्र आहे

मंत्री जितेंद्र आव्हाड हे प्राणी मित्र आहेत, त्याचबरोबर त्यांची मुलगी ही सुद्धा प्राणी मित्र आहे. त्यांनी इच्छा दर्शविल्यानंतर आपणही या बाबतीत पुढाकार घेतला. ही इमारत म्हाडाकडून बांधली जाणार असून केंद्राकडून याला काही निधी भेटेल का ते मला माहित नाही असेही त्या म्हणाल्या. हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याबाबत अजूनही काही सांगितलं गेलं नसलं तरी सुद्धा, या प्रकल्पाची सुरुवात लवकरात लवकर केली जाईल हे निश्चित.

Last Updated : Dec 24, 2021, 7:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details