मुंबई :शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर( After The Revolt of Eknath Shinde ) शिवसेनेत उभी फूट
( Vertical Split in Shiv Sena ) पडल्याने सरकार अल्पमतात आले. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली, त्यानंतर बंडखोर आमदारांविरोधात शिवसेने निदर्शने केली. शिंदे गटसुद्धा आता सक्रिय झाला असून, शिवसेनेला प्रत्येक कायदेशीर बाबींना ते उत्तर देत आहेत. नुकताच सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिल्यामुळे, शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेगआला आहे. ( ( BJP Move to Establish Power )
बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा : नुकतेच विधान सभा उपाध्यक्षांकडे शिवसेनेने बंडखोर आमदारांविरोधात अविश्वास ठराव सादर केला होता. तसेच, गटनेता नियुक्तीपत्रसुद्धा दिले होते. त्यामुळे याविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाल्यानंतर बंडखोर आमदारांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना 11 जुलैपर्यंत त्यांच्यावर अविश्वास ठराव होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या नियुक्त्या ह्याच ग्राह्य धरण्यात येतील. तसेच, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि शिवसेना पुरस्कृत प्रतोद अजय चौधरी यांना नोटीसा बजावल्या आहेत.