महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sharad Pawar Targeted By BJP MNS : निवडणुका समोर ठेवून भाजप- मनसे कडून शरद पवारांना टार्गेट - राज ठाकरे मुंबई ठाणे सभा

नुकतेच राज ठाकरेंनी मुंबई आणि ठाण्यात सभा घेत शरद पवारांवर निशाणा ( Raj Thackeray Mumbai Thane Public Meetings ) साधला. दुसरीकडे कालच देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवरून शरद पवारांना टार्गेट ( Devendra Fadnavis Criticized Sharad Pawar ) केले. त्यामुळे मनसे आणि भाजपकडून आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पवारांना टार्गेट करण्यात येत असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत ( Sharad Pawar Targeted By BJP MNS ) आहे.

निवडणुका समोर ठेवून भाजप- मनसे कडून शरद पवारांना टार्गेट!
निवडणुका समोर ठेवून भाजप- मनसे कडून शरद पवारांना टार्गेट!

By

Published : Apr 15, 2022, 4:18 PM IST

मुंबई -राज ठाकरे ( Raj Thackeray Mumbai Thane Public Meetings ) आणि त्यानंतर देवेंद्र फडणीस यांच्या कडून शरद पवार यांना टार्गेट करण्यात आला ( Devendra Fadnavis Criticized Sharad Pawar ) आहे. शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे जनक असून त्यांना टार्गेट करणं म्हणजे सरकारला टार्गेट करणं आहे. यातून अल्पसंख्यांकांच्या बाजूने शरद पवार भूमिका घेतात असे सांगण्याचा प्रयत्न विरोधकांचा असल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं ( Sharad Pawar Targeted By BJP MNS ) जातंय.



शरद पवारांकडे मोर्चा :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या सभेतून थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आक्रमण केले. त्यातच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आपल्या भाषणातून टार्गेट केल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीपासून राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण वाढल. शरद पवार हे कोणताही धर्म मानत नसून, ते नास्तिक असल्याचा वैयक्तिक हल्ला राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून केला होता. तर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शरद पवार यांना टार्गेट केलं. शरद पवार यांनी अल्पसंख्याक लोकांसाठी सोयीची भूमिका घेतात याबाबतचे 14 ट्विट देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले आहेत. धर्मावर आधारित आरक्षणाला पाठिंबा, इशरत जहा यांच्याबाबत केलं शरद पवार यांचे वक्तव्य, नवाब मलिक मुस्लिम असल्यामुळे त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय असं वक्तव्य देखील शरद पवार यांनी केले होते. या सर्व वक्तव्यांवर प्रश्नचिन्ह उभी करणारी एकूण 14 ट्विट देवेंद्र फडणीस यांच्याकडून करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा भारतीय जनता पक्षाने शरद पवार यांच्याकडे मोर्चा वळवला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात ( Raj Thackeray Criticized Sharad Pawar ) आहे.

निवडणुका समोर ठेवून भाजप- मनसे कडून शरद पवारांना टार्गेट!


पवार महाविकास आघाडीचे जनक :राज्यात महाविकासआघाडी सरकार आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका ही शरद पवारांची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाला एकत्र आणून सरकार बनवल्याने भारतीय जनता पक्षाच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास शरद पवारांमुळे दूर गेला असल्याची भावना भारतीय जनता पक्षात आहे. त्यामुळेच शरद पवार यांच्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मनामध्ये राजकीय आकस असणे सहाजिक आहे. त्यातच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता शरद पवार यांनी गेल्या काही वर्षांमध्ये केलेली काही वक्तव्य एका विशिष्ट समाजाला लाभ देणारी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे. तसेच केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका नाही तर, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हिंदू मुस्लिम समाजाच्या बाबतची वक्तव्य पाहायला मिळतील असे संकेत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले 14 ट्विट यामध्ये शरद पवारांनी घेतलेली त्या- त्या परिस्थितीची भूमिका सांगण्यात आली आहे. शरद पवारांनी त्यावेळी घेतलेली भूमिका ही कधीही लपून-छपून घेतलेली नाही. मात्र तरीही आज या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून महा विकास आघाडी सरकार आणि शरद पवार हे एका विशिष्ट समाजासाठी काम करत असल्याचं भासवण्याचा प्रयत्न या ट्विटमधून करण्यात आलं असल्याचाही विजय चोरमारे म्हणाले आहेत.


राज ठाकरे आणि भाजपचा हातात हात! :2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी आपला मोर्चा शरद पवार यांच्याकडे वळवला आहे. ठाण्याच्या सभेतील शरद पवार नास्तिक असून कोणताही देव व धर्म मानत नाहीत असा वैयक्तिक हल्ला राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केला होता. तसेच शरद पवार यांच्या पक्षाच्या स्थापने नंतरच महाराष्ट्र जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात होऊ लागली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी आपल्या भाषणातून केला. एकूणच राज ठाकरे यांच्या ही टार्गेटवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असलेले पाहायला मिळतात. राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात झालेल्या भाषण शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच महाविकास आघाडी सरकारमध्ये शरद पवार यांचे स्थान मोठ आहे. तसेच शरद पवार हे केवळ राज्यातच नाही तर देश पातळीवर ओळखले जाणारे एक मोठे नेते असल्याने यांच्यावर केलेल्या वक्तव्याला तेवढीच मोठी प्रसिद्धी मिळते. देश पातळीवर त्याची चर्चा होते हे राज ठाकरे यांना ठाऊक आहे. तसेच शरद पवार यांच्यावर राजकीय हल्ला म्हणजे महाविकास आघाडी वर समजला जातो. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या नंतर राज ठाकरे यांनी थेट शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष हे सध्या हातात हात घालून चालत आहेत. मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचा परिणाम निवडणुकांमध्ये नक्की होईल हे दोन्ही पक्षाला माहित आहे. त्यातच शरद पवार यांच्यावर थेट हिंदुद्वेष्टे आल्याची टीका झाल्यास त्याचा फटका राज्य सरकारची प्रतिमेवर देखील होतो हे राज ठाकरे नाही माहित असल्याने त्यांनीही थेट शरद पवार यांनाच टार्गेट केले असल्याचे मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं आहे.

निवडणुका समोर ठेवून भाजप- मनसे कडून शरद पवारांना टार्गेट!


पवारांवर 14 ट्विट म्हणजे रडीचा डाव :देवेंद्र फडणीस यांनी एका मागून एक 14 ट्विट शरद पवारांच्या बाबत केले. मात्र अशा प्रकारे घरात बसून ट्विट करणे हा रडीचा डाव आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणीस यांना लगावला. केवळ दोन समाजात राजकीय द्वेष पसरवण्यासाठी शरद पवार यांना टार्गेट करून अशा प्रकारची वक्तव्य किंवा ट्विट केले जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांच्या कडून करण्यात आला आहे.

हेही वाचा : 'राज ठाकरे उत्तम नकलाकार'

ABOUT THE AUTHOR

...view details