महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'शिवसेना नेते आता हिमतीने हे सत्य स्वीकारतील, की न्यायालयासमोर नाकारतील ही पाहायची वेळ'

भाजप आमदार राम कदम म्हणाले, की कंगनाच्या कोणत्याही आक्षेपार्ह विधानावर आम्ही समर्थन केलेले नाही व करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण अभिनेत्री कंगनाच्या कार्यालयावर सूडबुद्धीने शिवसेना नेत्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने कारवाई केलेली आहे असा समज राज्यातील जनतेचा झालेला आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्या दरम्यान शिवसेना नेत्यांनी हरामखोर नावाच्या शब्दाचा वापर देखील कंगनाच्या बाबतीत केला होता तो सर्वश्रुत आहे.

bjp mla ram kadam on high court decision and bmc action on kangana ranavat office
शिवसेना नेते आता हिमतीने हे सत्य स्वीकारतील

By

Published : Sep 28, 2020, 9:20 PM IST

मुंबई -कंगनाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेने शिवसेना नेत्यांचा सांगण्यावरून कारवाई केली म्हणत कंगनानं न्यायालयात धाव घेतली. त्यावर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. यात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौत हिच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण व्हिडिओ न्यायालयात सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने आज कंगनाच्या वकिलांना दिले. यावर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेना नेत्यांना टोला देत म्हटले, की शिवसेना नेते आता हिमतीने हे सत्य स्वीकारतील, की कोर्टासमोर नाकारतील ही पाहायची वेळ आहे.

शिवसेना नेते आता हिमतीने हे सत्य स्वीकारतील, की न्यायालयासमोर नाकारतील ही पाहायची वेळ
कंगनाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेने केलेल्या कारवाईविरोधात कंगनाने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे महापालिकेनं ही कारवाई केल्याचा दावा कंगनाने केला आहे. 'कंगना ट्विटच्या माध्यमातून सरकारच्या धोरणावर टीका करत होती. त्यातील एका ट्विटवर शिवसेनेचे संजय राऊत यांची तिखट प्रतिक्रिया आली आणि त्यांनी कंगनाला धडा शिकवायला हवा, असे म्हटले. 'हरामखोर' असा शब्दही वापरला. महापालिकेने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या तेव्हाच हे सगळे घडले. राऊत यांच्या माझ्याविरोधातील वक्तव्यानंतरच पालिकेचे अधिकारी बंगल्याची पाहणी करण्यासाठी आले, असा युक्तिवाद आज कंगनाच्या वकिलांनी कंगनाच्या सांगण्यानुसार केला.यावर राऊत यांच्या वकिलांनी तो युक्तिवाद फेटाळला. वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये राऊत यांनी कुठेही याचिकादार कंगनाचे नाव घेतलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर, राऊत यांनी कंगनाविषयी आक्षेपार्ह शब्द वापरला असेल तर न्यायालयात राऊत यांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ न्यायालयात सादर करा, असे निर्देश कंगनाच्या वकिलांना आज दिले. यावर भाजपने पुन्हा एकदा शिवसेना नेत्यांना चिमटे काढत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.यावर भाजप आमदार राम कदम म्हणाले, की कंगनाच्या कोणत्याही आक्षेपार्ह विधानावर आम्ही समर्थन केलेले नाही व करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण अभिनेत्री कंगनाच्या कार्यालयावर सूडबुद्धीने शिवसेना नेत्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने कारवाई केलेली आहे असा समज राज्यातील जनतेचा झालेला आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्या दरम्यान शिवसेना नेत्यांनी हरमखोर नावाच्या शब्दाचा वापर देखील कंगनाच्या बाबतीत केला होता तो सर्वश्रुत आहे. त्यामुळे शिवसेना नेते आता हिमतीने हे सत्य स्वीकारतात का की न्यायायलयासमोर नाकारतात हे पाहायची वेळ सध्या आहे, असे कदम यांनी म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details